शासनाचा आनंदाचा शिधा नव्हे कॅडबरी… लाभार्थ्यात दिवाळीत आणली बाधा,जिल्ह्यात अनेक ठिकाणी शिधा मिळालाच नाही तर ,२५ रू.द्या आणि गोडतेल घ्या

0
46

भारत पवार : मुख्य संपादक : पत्रकार नियुक्ती साठी तसेच जाहिरात आणि बातम्या साठी संपर्क करा : मो.९१५८४१७१३१

मालेगाव / देवळा : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : शिंदे फडणवीस सरकारने  दिवाळीच्या तोंडावर आनंदाचा शिधा म्हणून देण्यात येणारी किट अगदी अल्प दरात राज्यातील सर्व रेशन दुकानदार यांचे कडे देण्यात येणार आणि लाभार्थ्यांची दिवाळी गोड करणार अशी योजना सरकारने केली होती. सरकार तर्फे देण्यात येणारा आनंदाचा शिधा ह्या किट चे अनेक गरीब जनतेत आनंद पसरला होता.हे सरकार जनतेसाठी खरोख चांगल्या योजना आखत आहे.अशी समज अनेकांनी करून घेतली होती.आणि ही समज अखेर समजच ठरली…जसे एखादे लहान मूल रडत असेल तर आई त्यास कॅडबरी देऊन त्यास गप्प करते अगदी तसेच शिंदे फडणवीस सरकारने दिवाळीच्या निमित्ताने लाभार्थ्यांना कॅडबरी किट दिल्यासारखे केले आहे.

कालची भाऊबीज होती तरी जिल्ह्यात ७० ते ७५ टक्के लाभार्थ्यांना सरकारचा आनंदाचा शिधा मिळालाच नाही त्यामुळे जिल्ह्यातील जनतेत दिवाळी सारख्या सणात नाराजी पसरली होती.सरकारने आनंदाचा शिधा लाभार्थ्यांना अगदी अल्प दरात देणार यात १०० रुपयात रवा,तेल,साखर,आणि चणाडाळ असा शिधा देण्यात येणार असे जाहीर केले होते. आणि असा वादा सरकारने केला होता. मात्र प्रत्यक्षात बऱ्याच लाभार्थ्यांना असे काही मिळालेच नाही त्यामुळे हे सरकार घोषणा करून जनेच्या तोंडास पाने पुसते अशी प्रतिक्रया अनेक नाराज झालेल्या लाभार्थ्यांनी महाराष्ट्र न्यूज शी बोलताना व्यक्त केली.नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील माळवाडी ह्या गावी अनेक लाभार्थ्यांनी नाराजी व्यक्त करून सांगितले की,आमचे कडून २५ रू.घेऊन तेही बिल पावती न देता फक्त १ किलो गोडतेलाचे पाउच हातावर ठेवले.जर शासन १०० रु.मध्ये रवा,तेल,साखर आणि चणाडाळ देणार होते तर २५ रुपयात फक्त १ किलो गोडतेलाचे पाउच तेही बिल पावती न देता कसे काय संबंधित रेशन दुकानदार याने दिले ? याबाबत शंकाच असून याविषयी संबंधित जिल्हापुरवठा अधिकारी,तहसीलदार,पुरवठा निरीक्षक यांनी दखल घेऊन लाभार्थ्यांना न्याय मिळून द्यावा अशीही मागणी केली जात आहे.विशेष म्हणजे २५ रूपयात तेल देऊन इतर कोणतीच वस्तू दिली गेली नाही त्यामुळे प्रचंड नाराजी असल्याचेही लाभार्थ्यांनी बोलून दाखविले.

१०० रुपयात रवा, तेल,साखर आणि चणाडाळ असा आनंदाचा शिधा मिळणार होता असा शासनाचा वादा होता.हा वादा च फोल झाल्याचे उघडकीस आले आहे.जिल्ह्यात खरेतर २५-३० टक्के लाभार्थ्यांची दिवाळी गोड झाल्याचे समजते.जिल्ह्यात ४ लाख ८८ हजार ८ कुटुंब शिधा मिळविण्या साठी पात्र आहे.त्यानुसार शिधा वाटपाची प्रक्रिया सुरू झाली होती परंतु राज्य शासन आणि पुरवठा विभागाचा ताळमेळ योग्य नसल्याने अनेक कुटुंब पात्र असूनही दिवाळी संपली तरीही अजून शिधा मिळालेला नाही.२५ ते ३० टक्के कुटुंबांनाच दिवाळीत आनंदाच्या किटच्या भरोष्यावर गोड धोड बनवता आले. सरकारने सांगितल्या प्रमाणे अनेक ठिकाणी रवा,साखर, आणि चणाडाळ अजूनही मिळाली नसल्याने कॅडबरी देऊन मोठ्यांची समज शासनाने काढली की काय? असा सवाल लाभार्थ्यांनी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here