भारत पवार : मुख्य संपादक : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : पत्रकार नियुक्ती तसेच जाहिरात व बातम्या साठी संपर्क : मो.९१५८४१७१३१ मालेगाव : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : मालेगाव शहरात आणि ग्रामीण भागात दिवाळीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला.नागरिकांनी विविध प्रकारच्या खरेदी साठी शहरात खूपच गर्दी केली होती. मध्यम वर्गीय ,गरीब नागरिकांनी दिवाळीचा सणाचा आनंद जोरदार साजरा केल्याचे दिसत होते.येथील संगमेश्वर मधील पथ फाऊंडेशन च्या वतीने एक करंजी मोलाची म्हणून गरीबांना करंजी आणि अन्य मिठाईचे वाटप करण्यात आले. यावेळी पथ फाऊंडेशनचे अध्यक्ष ,उपाध्यक्ष,सचिव आणि समस्त सदस्यांनी उपस्थित राहून गरीबांना मिठाई वाटप करून त्यांची दिवाळी गोड केल्याने गरीबांना फाउंडेशनच्या पदाधिकारी आणि तरुणांविषयी विशेष कुतूहल वाटत असल्याचे त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते.यावेळी 52 खोली चंदनपुरी, चिंचबारी, सायने येथील गोर गरीबांना मिठाई वाटप करण्यात आली.
या कार्यक्रमा मध्ये पथ फॉउंडेशन चे सर्व सभासद उपस्थित होते.
या दिवाळीत गोरगरिबांच्या मुलांना पण काही तरी गोड पदार्थ मिळावा असा उल्लेखनीय कार्यक्रम फाउंडेशनच्या नव्या पिढीने घडवला.याचा आदर्श इतरांना प्रेरणा देणारा उपक्रम असल्याचे नागरिकांमध्ये बोलले जात आहे .




