सावध :तुमच्या कारचा ब्रेक धोका देऊ शकतो ,जास्त वेळ हॅन्ड ब्रेक लाऊ नका ..वाचा सविस्तर

0
71

भारत पवार : मुख्य संपादक ,पत्रकार नियुक्ती साठी तसेच जाहिराती आणि बातम्या साठी संपर्क करा : मो.9158417131

मुंबई : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : प्रत्येक कारला हॅन्ड ब्रेक असतो.तो कारच्या सुरक्षे साठी आणि आपल्या हिता साठी असतो.हे जरी खरे असले तरी ह्या ब्रेक साठी सुद्धा मर्यादा आहेत.हे आपणास ठाऊक नसते. हॅन्ड ब्रेक ला पार्किंग ब्रेक किंवा आपत्कालीन ब्रेक म्हणतात परंतु जर आपण हॅन्ड ब्रेक लावून कार जास्त वेळे करीता पार्किंग केली असेल तर कार नुकसान होते.

हॅन्ड ब्रेक कारच्या ब्रेकिंग सिस्टिमचा भाग आहेत.हे ब्रेक कार च्या मागील ब्रेकला जोडलेले असतात जेव्हा ते लागू केले जातात तेव्हा ते प्राथमिक ब्रेक पेक्षा कमी दाब देतात जेव्हा प्राथमिक ब्रेक योग्य कार्य करत नाही तेव्हाच हॅन्ड ब्रेक वापरला जातो. किंवा गाडी उतारावर उभी करायची असेल तेव्हा हॅन्डब्रेकचा वापर केला जातो.जर जास्त वेळ कार उभी करायची असेल तर हॅन्ड ब्रेक कधीही लाऊ नका तात्पुरती पार्किंग साठीच हॅन्ड ब्रेकचा वापर करणे फायदेशीर आहे.जर दोन आठवडे किंवा त्यापेक्षा अधिक कालावधी साठी कार उभी करायची असेल किंवा जास्त कालावधी साठी कार उभी असेल तर हॅन्ड ब्रेक कधीही लाऊ नये. हॅन्ड ब्रेक लावून जर जास्त कालावधी साठी कार उभी असल्यास कार चे ब्रेक पॅड जाम( पक्के)होण्याचा धोका असतो त्यामुळे ते चिकटू शकतात आणि जर का चीटकले तर त्यांना बदलणे हा एकमेव पर्याय आहे असे काही अभियंत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे मोठा खर्चचा भार सोसावा लागणार असेही त्यांनी म्हंटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here