पतीस मारून टाळू वरील लोणी खाण्यास निघालेली पत्नी राजश्री चा पती परमेश्वरने केला पर्दाफाश ,पोलिसात गुन्हा दाखल,मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता

0
72

( उदगीर नगरपालिका प्रशासनाने जबाबदारीचे भान न ठेवता मृत्यू दाखवलेले परंतु सद्या जिवंत असलेले परमेश्वर केंद्रे वरील चित्रात दिसत आहेत.)                                                  आपल्या  स्थानिक गावासह महाराष्ट्रातील ५०,०००+ वाचकसंख्या असलेल्या प्रत्येकाच्या घराघरात, आणि मनामनात असणारे निर्भिड, सडेतोड, बेधडक             ” महाराष्ट्र न्यूज ” साठी संपूर्ण राज्यातील जिल्ह्यात,तालुक्यात पत्रकार नियुक्त करण्यात येत आहेत तसेच आपल्या भागातील बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा : संपर्क : भारत पवार, मुख्य संपादक : ९१५८४१७१३१.                                         उदगीर _(लातूर) : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : परमेश्वर केंद्रे _ लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील संतापजनक प्रकार नगरसेविका आणि नगरपालिका प्रशासनास हाताशी धरून सख्या पत्नीने जिवंत पतीस मृत्यू दाखुन मिळविले चक्क मृत्यू प्रमाणपत्र आणि निघाली होती मृत्यूच्या टाळूवरील लोणी खाण्यास हा प्रकार पतीने उघडकीस आणताच संपूर्ण लातूर जिल्ह्यात पत्नी राजश्री ,नगरसेविका रेखा आपटे यांच्या आणि उदगीर नगरपालिकेच्या प्रशासनाचा ” गोरख धंद्या” विषयी संताप व्यक्त केला जात असून याबाबत मोठेच रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत पती परमेश्वर उर्फ प्रमोद केंद्रे (४५ )  यांच्या बाबत त्यांची पत्नी कारनामा करीत नावाजलेल्या राजश्री परमेश्वर केंद्रे यांनी नगरसेविका रेखा ज्ञानेश्वर आपटे यांना हाताशी धरून बनावट अर्ज,पंचनामा करून उदगीर नगरपालिकेच्या संबंधित अधिकारी यांचे कडे मृत्यू प्रमाणपत्र मिळविण्या साठी अर्ज सादर करून तसे  कुठलीही पडताळणी,चौकशी न करता नगरपालिकेच्या संबधित अधिकाऱ्यांनी मृत्यू प्रमाणपत्र दिले सुद्धा.त्यामुळे आता माझ्या पतीची संपत्ती, प्रॉपर्टी मला मिळणार असे खुशीत गाजर खाणाऱ्या पत्नीचा आनंद काही क्षणिक ठरला.पत्नीची आपबिती जेव्हा पती परमेश्वर उर्फ प्रमोद केंद्रे यांना माहीत होताच त्यांनी तात्काळ उदगीर शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.मी जिवंत असून मला मृत्यू दाखवलेच कसे ? मृत्यू प्रमाणपत्र दिले कसे ? याबाबत उदगीर नगरपालिका प्रशासनाविषयी संताप व्यक्त केला जात असून प्रशासनाचा भोंगळ कारभार यानिमित्ताने चव्हाट्यावर आला आहे. याबाबत नगरपालिेतील संबंधित अधिकाऱ्यांनी स्थानिक रहिवाशांकडून चौकशी करणे गरजेचे असताना किंवा नगरपालिकेच्या दप्तरी मृत्यूची नोंद आवश्यक असताना मृत्यू नोंद का नाही? याची चौकशी करणे गरजेचे होते .त्यामुळे नगरपालिकेचे संबंधित अधिकारी सुद्धा दोषी असल्याचे प्रथदर्शनी सिद्ध होते.याबाबत उदगीर शहरासह तालुक्यात नगरपालिकेची अब्रू चव्हाट्यावर आली असून संबंधित अधिकाऱ्यांचा भोंगळ कारभार याविषयी ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जात असून अधिकाऱ्यांच्या भोंगळ कारभार याविषयी चौकशी करून त्यांचेवर ही गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी जोर धरत असून याबाबत नगरपालिकेचे मुख्याधिकारी काय भूमिका घेतात ? याकडे ग्रामस्थांचे आणि संबंधित मृत्यू दाखवलेले परंतु जिवंत असलेले परमेश्वर केंद्रे यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान उदगीर शहर पोलिस ठाण्यात परमेश्वर उर्फ प्रमोद केंद्रे यांनी पत्नी  राजश्री परमेश्वर केंद्रे ,नगरसेविका रेखा ज्ञानेश्वर आपटे यांचे सह त्यांचे अन्य साथीदारांवर गु. र.नंबर १९/२२ भा. द. वि. कलम ४२०,४६७,४६८,४७१,३४ अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here