देवळा ,कळवण नगरपंचायतीचे आरक्षण जाहीर

0
44

भारत पवार : मुख्य संपादक : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज :९१५८४१७१३१.           देवळा : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी – देवळा येथील नगरपंचायतीची निवडणूक अत्यंत चुरशीची होऊन अनेकांना तोंडघशी पाडून किंग मेकरची भूमिका बजावणारे केदा आहेर खरोखर ” किंग ” ठरले आहेत.हे सिद्ध झाले आहे. केदा आहेर भाजपाचे जिल्हाध्यक्ष आहेत हे सर्वश्रुत आहेच परंतु ते देवळा येथील रहिवासी असल्याने देवळा नगरपंचायतीच्या निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांचे डोळे लागले होते.त्यामुळे ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात होती. आणि म्हणूनच केदा आहेर यांनी त्याप्रमाणे कंबर कसली होती.राष्ट्रवादीची अवस्था इतकी केविलवाणी केली की आज राष्ट्रवादीच्या घड्याळाकडे कोणी किती वाजले हे पहाने सुध्दा पसंत करत नसून राष्ट्रवादीचे किती आले ..!याचीच खंत देवळा राष्ट्रवादी प्रामाणिक कार्यकर्त्यांस लागली आहे. आज नुकतेच कळवण आणि देवळा नगरपंचायतीचे आरक्षण सोडत जाहीर झाले असून देवळा नगरपंचायतीचे नगराध्यक्ष पद खुल्या महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे.त्यामळे देवळा शहरात पुन्हा महिला राज अवतरले असून अनेक पुरुष नगरसेवक महिलाराज चे सांगणे आणि पुरुष नगरसेवकांनी ते करणे अर्थात वर्चस्व महिलांचे असणार आहे. त्यामुळे घुडघ्यास बाशिंग बांधणारे नगरसेवक यांचा मोठाच हिरमोड झाला आहे. एका भाजप नवनिर्वाचित नगरसेवकाच्या भावाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले होते की ,आम्ही मंत्रालयात फिल्डिंग लावली असून नगराध्यक्ष पद भावास मिळेल.जेव्हा त्यास कळाले की मला आणि भावास देवळा भाग सोडून आपले वजन पुढे कोणीच वापरू देत नाही.असे कळताच आपला भ्रमाचा भोपळा होता हे त्यास कळाले. तर कळवण नगरपंचायतीच्या कारभाराची चावी सर्वसाधारण पुरुष साठी राखीव असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here