नवी मुंबईतील शाळांची वाढली मुजोरी,शिक्षण शुल्क वसुली साठी विद्यार्थ्यांची पिळवणूक चालली ,शाळेत विद्यार्थ्यांना बसू न देणे ही हरामखोरी शासन परिपत्रक प्रमाणे योग्य आहे का ? सवाल

0
26

नवी मंबई – क स मा दे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज ” राजू केदारे याज कडून _  नवी मुंबईतील शाळांची मुजोरी अजूनही कायम आहे शैक्षणिक शुल्क वसूल करण्यासाठी विद्यार्थ्यांवर दबाव आणत आहेत आणि फी वसुली साठी विद्यार्थ्यांना तगादा लावत आहेत फी भरण्यास असमर्थ ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑन लाईन वर्गात बसू न देणे तसेच त्यांचे परीक्षेचे निकाल न दाखवणे असे प्रकार चालू आहेत विद्यार्थ्यांची खूपच पिळवणूक शिक्षक करत असून शासनाचे नियम चक्क केराच्या टोपलीत आम्ही ठेवल्याचे   असे बेताल वक्तव्य येथील शिक्षक पालकांशी बोलतांना करत होते तर विद्यार्थ्यांना फी भरल्या शिवाय शाळेत बसू न देणे ही हरामखोरी शासन परिपत्रक प्रमाणे योग्य आहे का ? असा संतप्त सवाल पालकांनी केला असून या कामी मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री आणि शिक्षणाधिकारी यांनी लक्ष घालून विद्यार्थ्यांची   शिक्षकांकडून होणारी  पिळवणूक थांबून विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान थांबून विद्यार्थ्यांना दिलासा देऊन त्यांचे अंधारातील भविष्य उजेडात आणून येथील शिकांवर कारवाई करावी अशी मागणी पालकांनी केली आहे तर वरील  पद्धतीचा प्रकार आज नवी मुंबईतील वाशी येथील सेंट लॉरेन शाळेच्या बाबतीत उघडकीस आला आहे या शाळेने ज्या विद्यार्थ्यांनि फी भरली नाही असल्या दहावीच्या मुलांचे बोर्डाचे अर्ज भरण्यास नकार दिला पालकांनी खुप वेळा शाळेशी बोलण्याचा खूप प्रयत्न केला परंतु शाळा काही ऐकून घेण्यास तयार होत नव्हती त्या मुळे संतप्त झालेल्या पालकांनि शाळेसमोर आंदोलन करून जोरदार घोषणाबाजी सुरू केले आहे। या शाळेतील १५ ते २० विद्यार्थ्यांनि शाळेची संपूर्ण वर्षाची फी भरलेली नाही त्या दहावीच्या विद्यार्थ्यांचे बोर्डाचे फॉर्म भरून घेण्यास शाळेने नकार दिला या बाबत पालकांना विचारले असता त्यांनी सांगितले की लॉकडाऊनच्या काळात बऱ्याच पालकांच्या नोकऱ्या गेल्या असून बरेच पालकांना पगार मिळाला नाही शाळेलस आम्ही फ़क्त ट्युशन फी घेण्यास सांगत आहोत परंतु शाळा सरसकट सर्व फी भरण्यास सांगत आहे। अशाच नवी मुंबईतील बऱ्याच शाळेची मुजोरी चालू आहे अश्या शाळेवर कारवाही व्हावी अशी मागणी अनेक पालकातर्फ़े होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here