उद्या _अमित ठाकरे ,आ.राजू पाटील आणि शालिनीताई ठाकरे यांच्या हस्ते मनसेच्या तीन शाखांचे नवी मुंबईत उद्घाटन

0
35

 

नवी मुंबई _ क स मा दे टाइम्स” महाराष्ट्र न्यूज ” _ मुंबईत मनसेचा कामाचा धडाका चालूच आहे. गेल्या काही महिन्यात नवी मुंबई मनसेत मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश झाले, अनेक नवीन शाखा उघडल्या. याच कामाचा भाग म्हणून मनसेच्या ३ शाखांचे उदघाटन रविवार, १० जानेवारी रोजी होणार आहे.

बेलापूर मधील दिवाळे गावात मनसे विभागअध्यक्ष तसेच रोजगार विभागाचे उप जिल्हाअध्यक्ष भूषण कोळी यांच्या पुढाकाराने नवीन शाखेची सुरुवात होणार आहे. त्याचप्रमाणे वाशी, सेक्टर-१ मध्ये मनसे शहर सहसचिव अमोल इंगोले यांच्या पुढाकाराने नवीन शाखा सुरु होत आहे. सोबत मनसेचे उपशहर अध्यक्ष प्रसाद घोरपडे यांच्या पुढाकाराने कोपर खैरणे , सेक्टर -१४ मध्ये नवीन शाखेची सुरुवात होणार आहे.

या तिन्ही शाखेचे उदघाटन मनसे नेते अमित राजसाहेब ठाकरे, आमदार राजूदादा पाटील, सरचिटणीस सौ. शालिनी ताई ठाकरे यांच्या हस्ते उदघाटन होणार असल्याचे नवी मनसेचे शहर अध्यक्ष गजानन काळे सांगितले आहे. सकाळी ११ वाजता बेलापूर मधील शाखेचे, १२ वाजता वाशी मधील शाखेचे, तर दुपारी १ वाजता कोपर खैरणे मधील शाखेचे उदघाटन होईल अशी माहिती गजानन काळे यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here