मालेगाव : क स मा दे टाइम्स “महाराष्ट्र न्यूज “_ भारत पवार याज कडून _ स्पेशल रिपोर्ट _ महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री ना.दादा भुसे यांना कोरोणा ची लागण झाल्याचे काल उशिरा समजल्याने त्यांना पुढील उपचारा साठी तातडीने मुंबई कडे रवाना व्हावे लागले.याबाबत सविस्तर माहिती अशी की मंत्री दादाजी भुसे यांनी कोविड 19 ची तपासणी केली असता त्यांना कोरोणा ची बाधा झाल्याचे उघडकीस आले.त्यांना तात्काळ मुंबई येथील एका खाजगी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आल्याचे रात्री उशिरा क स मा दे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज ” ला कळविण्यात आले.याबत भुसे यांनी प्रतिक्रया देताना सांगितले की माझ्या संपर्कात असलेल्या प्रत्येक व्यक्तीने गाफील न राहता कोरोणा चाचणी करून घ्यावी असे आवाहन करण्यात आले तर डॉक्टरांनी सांगितल्या प्रमाणे मी औषध उपचार घेत असून तुमच्या आशीर्वादाने लवकर चांगला होऊन जनसेवेत हजर होणार असेही त्यांनी यावेळी सांगितले.महाराष्ट्राचे लाडके कृषी मंत्री म्हणून दादा भुसे यांचे कडे समस्त जनता पाहत असून रात्रंदिवस जनते साठी विशेषतः शेतकऱ्यांसाठी झिझनारा ” अभ्यासू ” मंत्री ना.दादा भुसे यांनी महाराष्ट्र भरात ” ख्याती ” प्राप्त केली आहे.अशा लढवय्या मंत्री महोदयांना परमेश्वर लवकरच चांगले करो .अशी अपेक्षा महाराष्ट्र न्यूज चॅनल तर्फे मी व्यक्त करतो.. भारत पवार, मुख्य संपादक, महाराष्ट्र न्यूज ,9158417131
