June 27, 2022

सासु – सुनांचा झगडा ,नवऱ्याची लफडी पाहण्यास लोकांना आवडी ..! ” सावित्री ज्योती ” मालिका बंद करण्यात सोनी वाल्यांना कसली गोडी ?

1 min read

पुणे _ क स मा दे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज “_ संंतोष  बादाडे _ लिखीीत –
सावित्रीजोती आभाळा एवढी माणसं होती सोनी टीव्हीवर दाखविली जाणारी लोकप्रिय मालिका सावित्री ज्योती बंद होणार मनस्वी खुप दुःख झाले ,आज प्रेक्षकांनी ज्या मालिका खरं बघायला पाहिजेत त्या पाहत नाहीत परंतु एका नवऱ्याचे चार-चार लफडे,सासू-सुनांची भाडणं असणाऱ्या मालिका थोतांड अंधश्रध्दा मालिका पाहण्यात आपल्या आयुष्यातला वेळ वाया घालवतो!एका स्त्रीचे आणि पुरुषाचे,अनेक विवाह,आजच्या ज्या इतर मालिका आहेत संसारामध्ये भांडण कस कराव,संसार कसे तोडावे हेच दाखवलं जातं अशा मालिकांमध्ये आपल्याला खूप इंटरेस्ट आहे, कुणाचे कसे संसार उद्ध्वस्त करायचे एवढं पाहण्यात आजचा बहुतांशी आपला समाज पडलेला आहे,वाईट परस्थितीत नवऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी असणारी सावित्रीमाई आणि आपल्या आयुष्यामध्ये समान संधी देणारे महात्मा ज्योतिबा फुले,त्यांना पाहण्यात रस दाखवत नाही म्हणून आपले आयुष्य भकास आणि निरागस झाले आहे.परंतु खऱ्या मालिकेला न्याय देण्याचे काम हे प्रेक्षकांनी केलं पाहिजे होतं आज सावित्री ज्योती मालिका ही फक्त trp नसल्यामुळे बंद पडत आहे…!

षढयंत्र पहा..TRP म्हणजे काय आहे हे अजुन तरी मला माहित नाही.TRP मिळत नसल्याने एखादी मालिका बंद होते, याबाबत शंका आहे. कारण इतर मालिका (काहीतर चेनलही बघत नाहीत) बहुतेक लोक पाहत नाही, तरीही त्या मालिका कशा सुरू असतात. तेथे त्यांना TRP लागत नाही का?डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील मालिका सुरू असतांनाही सदर मालिकेचा TRP कमी आहे जर असेच चित्र राहिले तर मालिका बंद पडेल असे सांगितले व मालिका बंद झाली.परंतु 2019-20 या वर्षात सर्व वाहिन्यांमध्ये स्टार प्रवाह मराठी क्रमांक 1 वर आला आणि याबाबत स्टार प्रवाह मराठी या वाहिनीने प्रेक्षकांचे आभार मानत असल्याची जाहिरात ही केली.परंतु कोणत्या मालिकेचा TRP मुळे क्रमांक 1 मिळाला हे सांगितले नाही.स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर या मालिका दाखविण्याची वेळही एकच होती.या मालिकांचाही TRP कसा होता हेही सांगितले गेले नाही.आम्ही स्वत: आत्मपरीक्षण केले पाहिजे कि,आपण स्वत: आणि आपला परिवार सावित्री फुले मालिका पाहतो का? आणि इतरासही पाहण्यास सुचीत करतो का.?
क्रांतिसूर्य महात्मा फुले व सावित्रीमाई फुले यांचे कार्य समजून घेण्यासाठी विचारांची प्रगल्भता व संवेदनशील मनाची गरज पाहिजे समाजासाठी ज्यांनी तन-मन-धनाने कार्य केले.क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीमाई फुले यांचे थोर कार्य समजून घेण्यासाठी गरज आहे.स्त्रियांना समाजामध्ये सन्मानाचे स्थान मिळावं यासाठी फुले दांपत्यांनी प्रदीर्घ लढा दिला.स्त्री-पुरुष समान आहेत ही संकल्पना प्रथम फुले दाम्पत्याने विचारात कृतीत आणली. त्याच बहुजन-मराठा समाजाने फुले दाम्पत्यांना स्विकारले का?फुले दांपत्यांनी स्त्रियांच्या,पुरुषांच्या उद्धारासाठी जीवाचे रान केले.त्या फुले दांपत्याला आमच्या आधुनिक म्हटल्या गेलेल्या स्त्री-पुरुषांनी स्वीकारले का? मला असं वाटतं की आधुनिकता सध्या फक्त राहणीमानातच आली आहे ना की विचारात.विचाराची आधुनिकता आवश्यक आहे.ज्या फुलेदांपत्यामुळे आपल्या ओबडधोबड जीवनाला कायमचा आकार प्राप्त झाला. त्या फुले दांपत्याचे कार्य अनुभवण्याची संधी आपल्या समाजाला सावित्री ज्योती या मालिकेमुळे मिळाली होती. खरं तर या संधीच आपल्या समाजातील स्त्रीयांनी सोनच करायला पाहिजे होतं परंतु आपणाला फुरसत कुठे आहे? सासू-सुनांची भांडण,कुरघोड्या करणाऱ्या स्त्रीया,माझ्या नवऱ्याची बायको या सारख्या मालिका पाहून स्त्रीया आपला वेळ, पैसा व नीतिमत्ता पणाला लावत आहोत. हीच खरी खेदाची गोष्ट आहे परंतु आमच्या समाजाला व स्त्री वर्गाला याची जाणीवच नाही.अर्थात काही सन्माननीय अपवाद असतीलही यात काही शंका नाही.ज्यांच्यामुळे आपल्या जीवनाला अर्थ प्राप्त झाला, आभाळाला गवसणी घालण्याची क्षमता ज्यांच्यामुळे निर्माण झाली.त्या महात्म्यांना आपण विसरलो का? ज्यांनी प्रत्यक्ष पृथ्वीतलावर जन्म घेतला आणि मानवाच कल्याण केलं त्यांना विसरुन आपण काल्पनिक गोष्टींना महत्व देतोय…

सावित्री ज्योती ही मालिका आपल्या कसदार अभिनयाने आणखीनच प्रभावी केली ती अश्विनी कासार व ओमकार गोवर्धन या कलाकाराने. त्यांचे अभिनंदन केले पाहिजे. महात्मा फुले व सावित्रीमाई फुले यांचे जीवन साकार करण्याचा अभिनय करण्याची संधी अश्विनी कासार,ओंकार गोवर्धन यांना मिळाली ही त्यांच्यासाठी खूप गौरवाची गोष्ट आहे.मालिकेचे दिग्दर्शक महेश टिळेकर यांचेही अभिनंदन कारण समाजात वैचारिक परिवर्तन व्हावे यासाठी त्यांनी खूप कसदार प्रयत्न केला.महात्मा फुले व सावित्रीमाई फुले यांच्या जीवनातील बरेचसे प्रसंग अगदी पारदर्शक पद्धतीने सादर करण्यात आले.सावित्रीमाई फुले मुलींना शिकवायला शाळेत जात असताना भर चौकात सनातन्यांनी सावित्रीमाईच्या अंगावर चिखल टाकला तो प्रसंग आपल्या अंगाला हात लावू पाहणाऱ्या सनातन्यांना पायातल्या चपलांनी मारणाऱ्या सावित्रीमाई! अत्यंत मार्मिक पद्धतीने हा प्रसंग दाखवण्यात आला.मला वाटतं हा प्रसंग जर शाळेत जाणाऱ्या महाविद्यालयात जाणाऱ्या मुलींनी बघितला असता तर त्यांच्याकडे बघण्याची सुद्धा कोणी हिम्मत केली नसती. सावित्रीमाईचा आदर्श त्यांच्या पालकांनी घेतला नाही तर मुली तरी कुठून घेतील.?

मुलींसाठी शाळा सुरू केली म्हणून स्वतःचं घर सोडण्याची वेळ फुले दांपत्यावर आली यावेळी त्यांच्या वडिलांची म्हणजे गोविंदराव फुले यांची होणारी घालमेल डोळ्यात पाणी आणत होती. फुले दांपत्याच्या जीवनामध्ये आनंदाचे क्षण कमी व दुःखाचे क्षण अधिक होते परंतु या दुखाच्या क्षणात दुसऱ्याच सुख पाहणारे फुलेदांपत्य महान होते.फुलेदांपत्यांनी सामाजिक परिवर्तनाला हात घातला. समाजातील अनिष्ट प्रथा बंद करण्यासाठी सावित्रीमाईंनी पुढाकार घेतला.आणि दोघांनी मिळून अनिष्ट प्रथा परंपरा बंद पाडण्यासाठी उपाययोजना केल्या.
महात्मा ज्योतिराव फुले यांच्या तोंडचे शब्द म्हणजे हृदयाचा ठाव घेणारे होते! समाजातील प्रत्येक स्त्रीला आदर मिळावा यासाठी त्यांची चाललेली धडपड पाहून मन भरून येत होतं. डोळे आपोआपच अश्रूंना वाट मोकळी करून देत होते.सावित्रीला मूल होत नाही म्हणून जोतीरावांनी दुसरा विवाह करावा असा प्रस्ताव मांडला गेला तेव्हा ज्योतिराव फुले यांनी काहीच उत्तर न देता थेट कृती केली.ज्या दिवशी ज्योतीरावांसाठी मुलगी बघण्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला त्याच दिवशी त्यांनी सावित्रीमाई साठी नवरा मुलगा दाखवण्यासाठी आणला. उपस्थित सर्वांचे तोंड बंद झाले ज्योतिराव फुले म्हणाले की सावित्रीला सवत चालत असेल तर मलाही सवता चालेल. खरंच हा प्रसंग म्हणजे मूल होत नाही म्हणून दुसरं लग्न करणाऱ्या लोकांना चपराकच आहे.सध्या तर वंशाला दिवा मिळत नाही म्हणून दुसरे लग्न करणारे महाभाग ही आहेतच एकोणिसाव्या शतकामध्ये एवढा क्रांतिकारी विचार महात्मा फुले यांनी मांडला नव्हे कृतीत आणला तसा विचार एकविसाव्या शतकातही लोक करू शकत नाही ही खरी शोकांतिका आहे.सावित्रीमाईंनी लिहिलेल्या कवितांचा संग्रह छापावा कारण त्या कविता समाज परिवर्तन करून आज्ञानास खीळ बसवणाऱ्या होत्या परंतु एका स्त्रीनें लिहिलेल्या कविता छापल्या जाऊ नये यासाठी सनातन्यांनी सर्व उपाय योजले.परंतु जे समाजासाठी आवश्यक आहे ते झालेच पाहिजे त्यासाठी महात्मा फुले यांनी काटकसर करून सावित्रीमाई यांचा काव्यसंग्रह छापून आणला.अस्पृश्यांना सार्वजनिक ठिकाणी पाणी भरण्यास मज्जाव होता.दुष्काळाचे दिवस असल्यामुळे नदीचे पाणी आटल्यामुळे पाण्यावाचून अस्पृश्यांचे जीव जात होते परंतु सनातन्यांना कीव येत नव्हती म्हणून महात्मा फुले यांनी स्वतःची विहीर अस्पृश्यांसाठी खुली करून दिली. म्हणजे शिक्षणाच्या गंगेबरोबर पाण्याची गंगा ही खुली करून दिली.माणसाला माणसाप्रमाणे जगता यावं माणसाला जगू द्यावे यासाठी फुले दांपत्याचा लढा होता.हा महत्वाचा प्रसंगही दाखवण्यात आला..
सावित्री ज्योती या मालिकेत महात्मा फुले व सावित्रीमाई फुले यांच्या जीवनातील अनेक प्रसंग मार्मिकपणे रेखाटले गेले.परंतु महात्मा फुले व सावित्रीमाई फुले यांचे विचार कार्य समजून घेण्यासाठी मोठं मन असावं. महात्मा फुले यांच्या जीवन संघर्षातून खूप काही घेण्यासारखे आहे परंतु नतद्रष्ट लोकांना ते साधता आले नाही. म्हणूनच म्हणावसं वाटतं की महात्मा फुले व सावित्रीमाई फुले यांना समजून घेण्यासाठी प्रगल्भ विचार व संवेदनशील मनाची आवश्यकता आहे. महान लोकांचे विचार समजून घेण्यासाठी मोठं मन असावं लागतं.
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या कार्याला शतशः प्रणाम !

‘सावित्री-ज्योती’ मालिका बंद करण्याचे सोनी मराठी TV चॕनलचे षढयंत्र?सोनी TV चॕनल मधील काही भट भामटी मंडळी ‘सावित्री-ज्योती’ मालिका बंद करण्याच्या मार्गावर आहेत.महाराष्ट्राला सावित्री ज्योतीरावाच्या विचारांची गरज आहे सोनी मराठी चॕनल २६ डिसेंबर रोजी मालिका बंद करणार आहे.सोनी मराठी चैनल मालिका बंद करण्याचा खोडसाळपणा करत आहे आणी केला तर सोनी मराठी चॕनलवर’चे इतर कोणतेही कार्यक्रमाचे प्रक्षेपण संभाजी ब्रिगेड होऊ देणार नाही.सगळे कार्यक्रम आम्ही उधळून लावू.

महाराष्ट्रात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीमाई फुले यांची सोनी मराठी टीव्हीवरील मालिका 26 डिसेंबर नंतर सुद्धा सुरू राहिली पाहिजे. बंद करू नये यासाठी ‘महाराष्ट्र सरकार’ने (ठाकरे सरकारने) पुढाकार घ्यावा. सोनी मराठी चॕनल ला कळवावे.अन्यथा मुख्यमंत्र्यांनी या विषयावर विशेष लक्ष घालून मालिका चालू ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत. अन्यथा,सोनी टीव्हीचे कुठले कार्यक्रम संभाजी ब्रिगेड प्रसिद्ध होऊ देणार नाही.संभाजी ब्रिगेड कार्यालयात घुसून आंदोलन करेल असा ईशारा देण्यात आला.

 

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © All rights reserved. | kavyashilp Digital Media 7264982465 | Newsphere by AF themes.