मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटप …वाचा सविस्तर

0
73

भारत पवार : मुख्य संपादक :महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात पत्रकार नियुक्ती करण्यात येत आहे .तसेच  आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क : मो.९१५८४१७१३१

मुंबई : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : महाराष्ट्र राज्यातील सरकार आपापसात मोठे मनोरंजन घडून आणत असून मोठ्या हास्यास्पद घटना घडत असल्याने जनतेत मात्र नाराजीचा सुर उमटत आहे.गेल्या १५ दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी राष्ट्रवादीलाच दे धक्का दिल्याने राष्ट्रवादीच्या मोठ्या नात्यात संताप व्यक्त केला जात आहे.घरका भेदी लंका ढाये याप्रमाणेच अजित पवार आणि त्यांच्या समवेत छगन भुजबळ यासह अनेक नेत्यांनी  नेते शरद पवार यांना धक्का देऊन आपले बिढार भाजप मध्ये दाखल करून मंत्री पद पटकावण्यात यशस्वी ठरल्याने राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.

 

त्यामुळे शरद पवार यांनी या फुटीर वाद करणाऱ्या नेत्यांचे सुफडा साफ करण्या साठी अक्षरशः महाराष्ट्र पिंजण्याचे काम सुरू केले आहे.दरम्यान गेल्या १५ दिवसांपासून मंत्री मंडळाचा विस्तार आणि मंत्री पद कधी जाहीर केले जाणार या प्रश्नांचे उत्तर मुख्यमंत्री शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री अजित पवार यांचे कडे नव्हतेच. त्यामुळे अनेक तर्क वितर्क लावले जात होते.

 

कारण अजित पवार,देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात मात्र एकमत होत नव्हते.आता मात्र ह्या प्रश्नावर तोडगा निघाला असून उद्या  मंत्रिमंडळाचा विस्तार करून मंत्र्यांना खाते वाटप केले जाणार असल्याची माहिती कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज च्या हाती मिळाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here