गाव तसे चांगले पण समस्यांनी वेशीला टांगले …

0
17

_ पुणे – क स मा दे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज ” _ प्रगतीच्या शिखरावर नेणारी आणि गावाला उध्वस्त करणारी पंचायत म्हणजे ग्रामपंचायत होय..
विकासाचं एक मॉडेल गाव घडवायचं असेल तर विचार परिवर्तन,वैचारिक विचार व गाव विकास करणाऱ्या नागरिकांच्या बाजूने उभे रहा..
गावाकडे ग्रामपंचायत निवडणूकीचे वारे वाहू लागले आहेत,गावातील बाहेर गावी राहणारे बंधू-भगिनीनों सावध रहा..निसर्ग संधी प्रत्येकाला देतो,आता आपली पाळी आहे.कोरोनामुळे आपण मुंबई,पुणे,औरंगाबाद व ईतर जिल्हामध्ये अडकलेले आपण पण गावातील कोणत्या पुढारी व नेत्यांनी विचारपूस केली का ? जे आपल्या गावात येऊ देत नव्हते आता त्याची पाळी आहे,हे माञ विसरु नका म्हणजे झाले…

गाडी भाडे म्हणून १००० रुपये आणि एक बाटली व एक किलो मटण ताट संपली आपली लायकी..
तुम्हांला वाटले जर उमेदवार योग्य आहे तर तुम्ही स्वतःच्या खिशातील प्रवासभाडे खर्च करुन तुमच्या पसंतीचा उमेदवाराला मतदान करा.नाही तर तो अमक्याचा मुलगा आहे त्यांला मत द्या,तो तमच्या नेत्यांंच्या मागेपुढे लुडबुड करतो त्यांला मत द्या.हे बंद करा आणि जो लायक उमेदवार आहे त्यांलाच मतदान करा..
गावातील उमेदवार बघा,त्याचे
विचार,आचार,सुशिक्षित व गावाचा विकास करु शकतो का उघड्या डोळ्यांनी बघा नीट.ग्रामपंचायत ची निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली. गावाचे वेगवेगळे रंग, रूप या निवडणुकीतून बघायला मिळते. एकंदरीत गावाचं खरं दर्शन यातून होते.निवडणूक म्हणजे काय ? निवडणूक कशासाठी ? हेही बरोबर ठाऊक नसलेले लोक केवळ स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी, वर्चस्व दाखवण्यासाठी काहीही करायला तयार होतात. दोन पार्ट्याचा गाव चार-पार्ट्यात बदलतो…

कधीही गावाविषयी तळमळ आणि कळवळा नसणारे लोक ‘आम्हीच गावाचा उद्धार करू’ म्हणून बोलू लागतात. यात खरी गोची होते, ते गावासाठी प्रामाणिक काम करणाऱ्या सच्च्या मुलाची कार्यकर्त्यांची. यादरम्यान गावासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना दूर सारले जाते आणि राजकीय अस्तित्व दाखवण्यासाठी कधीही पुढे न आलेले लोक स्वतःचा झेंडा पुढेकरतात.निवडणूकीची प्रक्रिया खरेतर गावातील प्रत्येक माणसांसाठी ‘सेवक’ म्हणून काम करण्यासाठी आहे. मात्र ‘सेवक’ च्या ठिकाणी सगळे पुढारी होतात. आपल्याच रुबाबात वावरू लागतात. शासकीय योजनांची कुठलीही माहिती नसणारे लोक, कधीही कोणाच्या मदतीसाठी न धावून जाणारे लोक, कधीही गावाच्या हितासाठी एकत्र येऊन न काम करणारे लोक, काम करणाऱ्यांची टिंगल उडवणारे लोक, ऐन निवडणुकीच्या हंगामात स्वतःला ‘स्वयंघोषित नेते’ समजू लागतात.निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू झाली की एका घराचे दोन तुकडे तसे ठरलेले असतात. भाऊ-भाऊ आणि सासू-सुना एकमेकांशी बोलणे टाळू लागतात. सुरळीत सुरू असणारे घर शेजारच्या घरी संशयाने पाहू लागते…

गावात दारू आणि पैशांचा पूर येतो. गावाच्या विकासासाठी कधीही मोठी वर्गणी न देणारे लोक यात लाखो रुपयांची उधळण करतात. ‘रात्रीस खेळ चाले’ हे भयावह चित्र गावगाड्याला नेहमीच मारक ठरत आले आहे. गावाच्या बाहेर बैठकी होतात. शेतात पार्टी होते, कधीही न विचारणारे लोक एकमेकांना ‘कसं काय चाललंय भाऊ’ म्हणून विचारू लागतात. साधारणता निवडणूक कोणी जिंकतो, कोणी हरतो मात्र यातून गाव सावरायला पुढची पाच वर्षे निघून जातात. केवळ सह्या मारण्यापूरते बरेच लोकप्रतिनिधी खुर्चीवर बसतात. ना त्यांना कधी ग्रामसभा कळलेली असते, ना कधी पुढाकार घेऊन कसले कामे केलेली असते. ग्रामसभेत लोकांना उत्तर देण्याची देखील त्यांच्यात धमक नसते. लोकांना सामोरे जाण्यासाठी लोकप्रतिनिधीत हिंमत नसते.अशी कित्येक गावात उदाहरणे आहेत, हे वेगळे सांगायला नको….!
एक साधे अभियान देखील राबवण्याची धमक नसलेले लोकप्रतिनिधी गावाचा खरोखरच उद्धार करतील का ? हे प्रश्न सर्वसामान्यांना का पडू नये. सर्वसामान्यांनी अशा लोकांना धारेवर का धरू नये..मुळ मुद्दा हा की जे काही देशामध्ये आदर्श गावांचे आपण नाव घेतो, त्यातील काही निवडक कामे देखील आपण करू शकतो का ? त्यांचा आदर्श घेऊ शकतो का ? हे प्रश्नच आपल्याला पडत नाहीत. त्यावेळेस खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधी गावाला मारक ठरतात. पुढची पाच वर्ष कधी संपेल ? हा विचार करणारे लोकप्रतिनिधी देखील आजही अनेक गावात आहेत.वळवळ आणि चळवळ जगणारे प्रत्येक गावात खरी दहा-पाच मंडळी असतात. त्यांचा शोध घेऊन गावाने खऱ्या अर्थाने त्यांना संधी देण्याची गरज आहे…!
काम करणारे कार्यकर्ते कधीच निवडणुकीच्या रिंगणात फारशी उतरत नाहीत. त्यांना सत्तेचा मोह नसतो. सातत्यपूर्ण गावाच्या हितासाठी काही आपण योगदान देऊ शकतो का ? या विचारात त्यांचे आयुष्य सुरू असते. अशा लोकांना शोधणं आणि संधी देणे गावासाठी अत्यंत महत्त्वाचं ठरतं.आपण सूज्ञ सुशिक्षित नागरिक आहोत. विचारी आहोत. समजदार आहोत. संत तुकारामापासून तुकडोजी पर्यंतचा आधुनिक विचार मांडणारे आणि सांगणारे आहोत‌ तर खऱ्या अर्थाने गावागावात विरोध निवडणुकांसाठी का प्रयत्न करु नयेत ?गावातील तंटे गावातच मिटवायचे असतील, पुढची पाच वर्ष नव्हे तर वर्षानुवर्षे गावात शांततेचे वातावरण निर्माण करायचं असेल, विकासाचं एक ‘मॉडेल गाव’ घडवायचं असेल तर खऱ्या अर्थानं राजकीय पक्षापेक्षा गावकऱ्यांनी गावाचे पुढारी नेमावेत.आदर्श आणि स्मार्ट झालेली बरीच गावे निवडणुकांमुळे ठप्प झालेली आहेत. पुढे जाणारी गावे मागे आलेली आहेत‌. अशी बरीच उदाहरणे असतांना आपल्या गावाच्या हितासाठी आपण पुढाकार घेत नसाल तर आपल्या सुज्ञपणाला फारसा अर्थ नाही.एखादे अभियान राबवत असताना गावात अविरोध निवडणुक नसेल तर त्याचे गुणदान मिळत नाही. अर्थात गावाला जिल्ह्यात, राज्यात, देशात चमकावयाचे असेल अविरोध निवडणुकांशिवाय पर्याय नाही.
विकासाचं एक मॉडेल गाव घडवायचं असेल तर विचार परिवर्तन व वैचारिक विचार करणा-या नागरिकांच्या बाजूने जरी आपण उभे राहीलो तरी परिवर्तनाचा पॅटर्न गावात निर्माण व्हायला वेळ लागणार नाही…!
✍️संतोष शकूंतला आत्माराम  बादाडे. क्षिि

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here