मुंबईत रिपब्लिकन सेनेला भगदाड पडले,शेकडोंनी रिपाई डेमोक्रॅटिक मध्ये दाखल झाले

0
74

 

मुंबई दि.27 क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज _ (प्रतिनिधी) डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेला सोडचिठ्ठी देऊन शेकडो आंबेडकर चळवळीच्या कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक मध्ये प्रवेश घेतला आहे.

सत्तेपासून वंचित राहिलेल्या आंबेडकर चळवळीला राजकीय दिशा देण्यासाठी शेकडो आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन सेना सोडून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक मध्ये नुकताच प्रवेश घेतला आहे.

सर्वसामाण्यांना सत्तेत सहभाग मिळावा व आंबेडकर चळवळ व्यापक आणि स्वाभिमानी स्वरूपात वाढावी यासाठी रिपाई डेमोक्रॅटिक पक्षात अनेकांनी उडी मारल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.

युवा अभ्यासू व राजकीय महत्वकांक्षा आणि उच्चशिक्षित असलेले पक्षप्रमुख म्हणून कनिष्क कांबळे यांना पाहिले० जाते, यामुळे आरपीआय डेमोक्रॅटिक च्या माध्यमातून स्वाभिमानी आंबेडकरी चळवळ उभारावी या शुद्ध हेतुने रिपब्लिकन सेनेला सोडचिठ्ठी देऊन शेकडो कार्यकर्त्यांनी समाजभूषण वसंत कांबळे यांच्या नेतृत्वात माजी आमदार दिवंगत टी एम कांबळे स्थापित डॉ बाबासाहेबांच्या संकल्पनेतील पक्ष, रिपाई डेमोक्रॅटिक मध्ये प्रवेश केला असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.

समाजभूषण वसंत कांबळे यांच्या प्रवेशाने डेमोक्रॅटिक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला नवसंजीवणी मिळाली असून रिपब्लिकन सेनेला भले मोठे भगदाड पडले आहे. यांच्या पाठोपाठ अजून एक फार मोठी कार्यकर्त्यांची फळी डेमोक्रॅटिक आरपीआय मध्ये लवकरच जुडणार असून आरपीआय च्या अन्य गटापेक्ष्या डेमोक्रॅटिक गटाला चांगले भविष्य असलयाचे राजकीय जाणकारांचे मत आहे.

येणारी महापालिका लक्षात ठेवुन पक्षबंधानी मजबूत करण्याचे काम जोरात चालू असून इच्छुक कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयास भेट द्यावी असे आवाहन केंद्रीय महासचिव डॉ राजन माकणीकर यांनी केले आहे.

* पाहिजेत _ महाराष्ट्र न्यूज साठी नवी मुंबई ,जुनी मुंबई,ठाणे,पालघर,दादर,कल्याण,विक्रोळी,घाटकोपर, उल्हासनगर,वाशी,पनवेल,रत्नागिरी,रायगड यासह संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्ह्यात,तालुक्यात पत्रकार,जाहिरात प्रतिनिधी , ब्यूरो चीफ,तसेच विभागीय संपादक,उपसंपादक,कार्यकारी संपादक तात्काळ नियुक्त करणे आहेत. इच्छुक असणारे आणि मनापासून पत्रकारितेची , लिखाणाची व जनसंपर्क भरपूर असणाऱ्यांनी च  संपर्क करावा. संपर्क _

भारत पवार , मुख्य संपादक / संचालक ,महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल ,मो.9158417131

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here