मालेगाव मनपाच्या अधिकाऱ्यांची डोळेझाक नागरिकांचा जीव धोक्यात ?
1 min read
मालेगाव : क स मा दे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज ” प्रतिनिधी _ नासिक जिल्ह्यातील मालेगाव येथील महानगर पालिकेच्या नव्या आणि जुन्या इमारतीत कोरोना महामारी पासून बचाव करण्यासाठी कुठलेही ठोस पाऊले उचलली नाहीत त्यामुळे नागरिकांना भविष्यात महामारी पासून धोका संभवतो त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून या साठी वेळीच पाऊले उचलून नागरिकांचे महामारी पासून बचाव करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते रामदास बच्छाव यांनी एका निवेदनाद्वारे मालेगावचे प्रांत अधिकारी यांचे कडे केली आहे.त्यांनी निवेदनात म्हटले आहे की मालेगाव महानगर पालिकेच्या नव्या आणि जुन्या इमारतीत दिवस भरातून शेकडो नागरिक , महिला आपल्या कामा निमित्त ये जा करत असतात त्यांचे साठी मनपाच्या संबधित अधिकाऱ्यांनी कुठल्याही प्रकारे निर्जंतुक उपाय योजना केलेल्या नाहीत किंवा सनिताईझर ठेवलेले नाही याबाबत अधिकाऱ्यांनी आरामात डोळेझाक केली असून त्यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात येऊ शकतो म्हणून याबाबत मनपा ने त्वरित उपाय योजना कराव्यात व जनतेस भय मुक्त करून कारोना पासून बचाव करावा अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
