Home क्राइम मालेगावी झाला गोळीबार,कोरड्या जखमा ओल्या होण्याचे संकेत ?मालेगावी नव्यानेच दाखल एस. पी.आणि...

मालेगावी झाला गोळीबार,कोरड्या जखमा ओल्या होण्याचे संकेत ?मालेगावी नव्यानेच दाखल एस. पी.आणि नविनच जिल्हा पोलीस अधीक्षक यांना गुंडांचे आव्हान ?मालेगाव धुसमुसतेय तर होतेय घुसमट जनतेची …

0
90

मालेेगाव गुंडागिरी सामराज्य होण्याच्या मार्गावर
मालेगाव मध्य भागात पुन्हा एकदा गोळीबार
मालेगाव येथील मध्य भागातील ६०फुटी रोड वर दोन व्यक्तीनी दुचाकीवरून येऊन भर चौकात गोळीबार केला शेख गुफरान शेख इब्राहिम यांचा सह त्यांचे चार मित्र चहा पीत असताना हे दोघे इसम दुचाकीवर आले आणि त्यांनी शेख गुफरान यांच्या दिशेने गावठी पिस्तूलाने गोळ्या झाडल्या यात शेख यांच्या हाताच्या कोपऱ्यात गोळी गेली व त्यांचा मित्राच्या पायाला गोळी चाटुन गेली या घटनेची माहिती पवार वाडी पोलिस ठाण्यात कळताच घटना स्थळी पोलिस पोचले पण तो पर्यंत गोळी झाडणारे तेथून पसार झालेले होते सदर घटनेचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे  पवार वाडी  API पावरा यांच्याशी आमचे मालेगाव कसमादे टाइम्स “महाराष्ट्र न्यूज

” चे प्रतिनिधी निलेश कासार यांनी विचारणा केली असता त्यांनी या सर्व घटणेची माहिती देऊन भा. द. वि.क.३०७,३२४/३४ सह विना परवानगी हत्यार वापरले म्हणून 3/२५,५/२७ नुसार मुद्दसिर हुसेन अखतर हुसेन व त्याच्या एका सहकारी( नाव समजू शकले नाही) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी हिंदू च्या सणा ची चाहूल लागताच असल्या घटना घडणे म्हणजे मालेगावात घडलेल्या मागील दंगली ची चाहूल तर नाही अर्थातच कोरड्या झालेल्या जखमा ओल्या करण्याचे गुंडांचे पोलिसांना  संकेतच म्हणावे लागेल की काय ? असा प्रश्न येथील जनतेला पडला आहे तर मालेगावी नव्याने आलेले एस. पी.तसेच नासिक पुण्यभूमीचा मान मिळालेले नव्यानेच दाखल झालेले जिल्हा पोलीस अधीक्षक  यांना सुद्धा गुंडांचे आव्हान म्हणावे लागेल ?त्यामुळे आज मालेगाव धुसमुसतेय तर जनतेची घुसमट होतांना दिसते. घटनेचा  पुढील तपास  एपीआय पावरा यांच्या कडे सोपविण्यात आला .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here