अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा पालकमंत्री छगनजी भुजबळ , देवळ्याचे सुनिल आहेर बोलले विकास कामांना दिले बळ ..!
1 min read
ओझरटाऊनशिप :-कसमादे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज ” – भारतराज पवार यांज कडून – महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री ना.छगनजी भुजबळ यांनी जनहिताच्या अनेक विकास कामांना ” बळ ” दिले असून असा विकास कामांचा ” महामेरू ” भुजबळ साहेब आपणास लाभल्याने आपण किती भाग्यवान आहोत अशा शब्दात ना.भुजबळ साहेबांच्या जन्मदिनी शुभेच्छा देतांना नासिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील तरुणांचे हृदय सम्राट ,तालुक्यातील विकास कामांची बुलंद तोफ राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील ( गोटू आबा) परशराम आहेर यांनी कसमादे टाइम्स ( क.टा.)च्या ” महाराष्ट्र न्यूज ” शी आपले मत प्रकट केले .महाराष्ट्रातील जनते साठी विशेषतः जिल्ह्यातील जनते साठी ना.छगनरावजी भुजबळ यांचे योगदान खूप मोठे असून संपूर्ण आयुष्य जनतेच्या कल्याणा साठी च अविरतपणे पणास लावले आहे. असेही गोटू आबा यांनी सांगून शुभेच्छा दिल्या. तर

देवळा येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक ,जितेंद्र ( जितू अणा ) आहेर यांनी पालकमंत्री भुजबळ साहेबांना शुभेच्छा देतांना क.टा.”महाराष्ट्र न्यूज “शी बोलताना सांगितले की भुजबळ साहेबांचे खूप मोठे योगदान महाराष्ट्रास लाभले असून राज्यास भुजबळ साहेबांच्या रूपाने विकाशी पुरुष आपणास लाभले आहेत विकास कामांच्या बाबतीत भुजबळ परिवारांचे योगदानाचे मुल्यच करता। येणार नाही अशा विकास कामांच्या योध्यास मी भरभरून शुभेच्छा व्यक्त करतो असेही जितेंद्र आहेर यांनी सांगितले.