June 27, 2022

जर गद्दारी केली शेतकऱ्यांशी ,खबरदार गाठ आहे माझ्याशी डॉ.प्रताप दिघावकर यांचा व्यापाऱ्यांच्या नाकास सनका आणणारा झणझणीत ईशारा

1 min read

वासोळ : कसमादे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज ” – प्रशांत गिरसे याज कडून – भारत कृषी प्रधान देश आहे शेतकरी सुखी तर आपण सुखी ,शेतकरी स्वतःची भूक विसरुन रात्रीची पहाट करतो राब राब राबतो आणि शेती पिकवतो परंतु त्यास अनेक संकटाना सामोरे जावे लागते कधी निसर्गाचा कोप तर कधी निसर्गाचा लहरी पणा असतो त्यामुळे पिके होत्याचे नव्हते करतो कर्ज बाजारी होतो त्यामुळे  शेतकऱ्यांचा संसार उघड्या वर पडतो हि स्थिती आहे .आणि जर कधी बऱ्यापैकी पीक निघाले तर  व्यापारी लोकांचा प्रकोप असतो शेतकरी मोठ्या आशाळ भूत नजरेने पाहून मातीमोल पीक विकून मोकळा तर होतो परंतु रोखीने नाही तर व्यापारी चेक देतो शेतकऱ्या कडे परंतु बऱ्याचदा तो व्यापारी ,व्यापारी नसतो तो महाठग निघतो हे शेतकऱ्यास केव्हा कळते त्या व्यापाऱ्याने दिलेला चेक वठत नसतो तेव्हा ! हे जळजळीत बोल आहेत नासिक परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.प्रताप दिघावकर यांचे .त्यांनी नुकताच नासिक येथे आपला पदभार स्वीकारला याप्रसंगी डॉ.दिघावकर यांनी पत्रकारांशी वार्तालाप करताना बोलत होते ,पुढे त्यांनी सांगितले की

 

 

शेतपिके खरेदी करून त्याचा मोबदला न देता फसवणूक  किवा गद्दारी  करणाऱ्या व्यापाऱ्यांना गुन्हे दाखल झाल्यानंतर पैसे अदा करण्यासाठी आठ दिवसांची मुदत दिली जाईल. या कालावधीत व्यापाऱ्याने पैसे अदा केले नाहीत, तर त्यांच्या मुसक्या आवळून कठोर कारवाई केली जाईल, असा सणसणीत पण नाकास सणका आणणारा ईशारा

डॉ. प्रताप दिघावकर यांनी दिला .

डॉ. दिघावकर यांनी नाशिक परिक्षेत्राच्या विशेष पोलिस महानिरीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यावेळी ते बोलत होते मी स्वतः शेतकरी कुटुंबातून आलो आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्यांची जाणीव आहे. वर्षभर मेहनत घेऊन कष्टाने पिकविलेली पिके शेतकरी विश्वासाने अन्य राज्यांतील व्यापाऱ्यांकडे सुपूर्द करतात. व्यापारी शेतकऱ्यांना धनादेश (चेक) देतात. हा धनादेश बँकेत वठला नाही की फसवणूक झाल्याचे लक्षात येते. अशा शेतकऱ्यांच्या तक्रारी पोलिस गांभीर्याने घेत नाहीत, असे माझे निरीक्षण आहे. परंतु, हे प्रकार गांभीर्याने घेऊन प्राधान्याने गुन्हे दाखल करावेत, असे आदेश परिक्षेत्रातील सर्व पोलिस स्टेशन्सच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © All rights reserved. | kavyashilp Digital Media 7264982465 | Newsphere by AF themes.