Home Breaking जिल्ह्यातील आरोग्यविभागात जोरदार खळबळ : तीन वर्षांचा तक्रारींचा हिशोब चुकता, जिल्हा आरोग्य...

जिल्ह्यातील आरोग्यविभागात जोरदार खळबळ : तीन वर्षांचा तक्रारींचा हिशोब चुकता, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांनी अखेर खाल्ला निलंबनाचा मोठाच दणका ! तर डॉ. राजेंद्र बागुल जिल्हा आरोग्य अधिकारी

0
13
Oplus_131072

भारतराज पवार : राज्य मुख्यसंपादक  : महाराष्ट्र न्यूज : ९१५८४१७१३१ 

नाशिक : क.टा. महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन न्यूज चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क _ जिल्हा परिषदेचे  नाशिक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर वामनराव मोरे  यांना आरोग्य विभागातील शासनाने निलंबित करण्याचा जबरदस्त दणका दिल्याने तक्रार करणाऱ्या कर्मचाऱ्यांत समाधान पसरले आहे तर डॉ.मोरे यांचे धाबे दणाणले आहे. डॉ.मोरे यांच्या कामकाजा बाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या असल्या कारणाने राज्याचे आरोग्य मंत्री ना.प्रकाश आबिटकर यांनी याबाबत निलंबनाची कारवाई केल्याचे समजते.डॉ.मोरे यांच्या विरुद्ध कर्मचाऱ्यांचा छळ , कामात दुर्लक्ष, आरोग्य केंद्रांना भेटी न देणे अन् बदली प्रक्रियेत आर्थिक गैरव्यवहाराच्या तक्रारी दाखल झाल्या होत्या.

जिल्हा आरोग्य विभागात खळबळ उडवून देणाऱ्या कारवाईत नाशिकचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांना निलंबित करण्यात आले आहे. गेल्या तीन वर्षांपासून त्यांच्या कार्यपद्धतीबाबत सातत्याने तक्रारी दाखल होत होत्या. अखेर या तक्रारींची गंभीर दखल घेत आरोग्य विभागाने निलंबनाची कारवाई केली आहे.

या तक्रारींची गेल्या तीन वर्षांतील पार्श्वभूमी तपासून आरोग्य विभागाने कारवाईचा निर्णय घेतल्याची माहिती आहे.

दरम्यान, गत महिन्यात प्रथमच जिल्हा दौऱ्यावर आलेले आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडेही डॉ. मोरे यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर लेखी तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यामुळे या प्रकरणाला अधिक गांभीर्य प्राप्त झाले होते. वर्षभरापूर्वी जिल्हा परिषदेच्या विशाखा समितीकडेही डॉ.मोरे यांच्या विरुद्ध तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या.त्याबाबतही चौकशी करण्यात आली होती.

तक्रारींची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने सुमारे १५ दिवसांपूर्वी डॉ. मोरे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यावर डॉ. मोरे यांनी आपला खुलासा सादर केला. मात्र, हा खुलासा समाधानकारक नसल्याचे विभागाच्या निदर्शनास आल्यानंतर अखेर त्यांच्या निलंबनाचे आदेश काढण्यात आले.

या कारवाईमुळे नाशिक जिल्हा आरोग्य विभागात मोठी खळबळ उडाली असून, गेल्या तीन वर्षांतील तक्रारी आणि प्रशासनाच्या कारवाईकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. निलंबनाच्या काळात पुढील चौकशी आणि प्रशासकीय कार्यवाहीला वेग येण्याची शक्यता आहे.  डॉ. सुधाकर वामनराव मोरे यांनी १५ जुलै २०२३ रोजी नाशिक जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला होता. यापूर्वी ते रायगड जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत होते. नाशिक मध्ये येऊन पदभार स्वीकारल्या नंतर त्यांनी मात्र कहरच माजवला होता असे त्यांच्या विरुद्ध दाखल केलेल्या तक्रारी वरुनच कळते.

सध्या नाशिक जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून नाशिकचे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र बागुल यांच्या कडे जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून अतिरिक्त कार्यभार दिला आहे. डॉ. बागुल अत्यंत सोज्वळ , कर्तव्य तत्पर सगळ्यांच न्याय देणारे व्यक्तिमत्व असल्याचे आजवरचा त्यांच्या विषयीचा अनुभव आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य अधिकारी , कर्मचारी वर्गात आंदच पसरला असल्याचे समजते.
सुरगाणा येथील डॉ. जयेंद्र थविल यांनाही निलंबित 
सुरगाणा तालुक्यातील पांगारणे प्रा. आ.केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जयेंद्र थविल यांनाही आपला हिशोब चुकता करावा लागला असून शासनाने त्यांनाही निलंबित केले आहे.त्यांच्या कामकाजाबाबत जुन्या तक्रारी होत्या की , मुख्यालयी थांबत नाही , रुग्ण तपासणी करत नाही आदी तक्रारी लोकप्रतिनिधींकडून दाखल करण्यात आल्या होत्या.त्यावर डॉ. थविल यांची चौकशी सुरू होती.अखेर त्यांनाही निलंबित करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here