भारत पवार : मुख्य संपादक : महाराष्ट्र न्यूज : ९१५८४१७१३१
देवळा / भावडे : क. टा. महाराष्ट्र न्यूज ऑनलाइन न्यूज चैनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : कळवण तालुक्यातील मानूर येथील शरद पवार स्कूल येथे आयोजित जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत भावडे येथील व्ही.के.डी. इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.
या स्पर्धेत विद्यालयाच्या १९ वर्षांखालील वयोगटातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. १९ वर्षांखालील मुलींच्या संघाने दमदार खेळाचे प्रदर्शन करत अंतिम फेरीपर्यंत मजल मारली. अंतिम सामन्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला; मात्र विद्यालयाच्या अनिशा समाधान मोरे आणि समृद्धी प्रवीण देवरे या दोन्ही खेळाडूंनी वैयक्तिक कामगिरीत जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक पटकावत विभागस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेसाठी पात्रता मिळवली.
या यशस्वी खेळाडूंना विद्यालयाचे क्रीडा शिक्षक निलेश भालेराव, चेतना शेवाळे आणि ऐश्वर्या जाधव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थिनींच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे चेअरमन संजय देवरे, सेक्रेटरी मीनाताई देवरे, विद्यालयाचे प्राचार्य नितीन वाघ, तसेच **कैलास सागर,बबलू देवरे, हेमंत शिंदे **यांनी विजेत्या खेळाडूंचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले. तसेच आगामी विभागस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेसाठी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.





