भारतराज पवार : राज्य मुख्यसंपादक : महाराष्ट्र न्यूज : ९१५८४१७१३१
नाशिक कुंभनगरीतून : क.टा. महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन न्यूज चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : उत्तर महाराष्ट्रातील व्हॉईस ऑफ मिडीयाचा विभागीय केडर कॅम्प नाशिक कुंभनगरीत उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमात अनेक वक्त्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. प्रारंभी मविप्र चे सरचिटणीस ॲड नितीनजी ठाकरे , व्हॉईस ऑफ मिडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा समारंभाचे अध्यक्ष मा. अनिलजी म्हस्के , व्हॉईस ऑफ मिडियाचे प्रदेश अध्यक्ष मुख्य प्रमुख अतिथी विजयजी चोरडिया , मा. नरेंद्र देशमुख , प्रादेशिक अध्यक्ष व्हॉईस ऑफ मिडीया , मा. दिलीपजी साळुंखे , उत्तर महाराष्ट्र प्रमुख , व्हॉईस ऑफ मिडीया यांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात केली.



पत्रकार आपला जीव धोक्यात घालून आपले काम पार पाडत असतो. त्याअनुषंगाने पत्रकाराने उचलले प्रत्येक पाऊल ही एक क्रांती असते. त्यासाठी व्हॉईस ऑफ मिडीया ही संघटना पत्रकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असून गेल्या चार वर्षांपासून ही संघटना कार्यरत असून आपल्या भारत देशाच्या प्रत्येक राज्यात आणि प्रत्येक राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात , तालुक्यात व्हॉईस ऑफ मिडियाचे जाळे पसरले आहे अनेक पत्रकार ह्या संघटनेत कार्यरत आहेत आणि होत आहेत.त्यामुळे व्हॉईस ऑफ मिडीया भारतातच नव्हे तर तब्बल ७६ देशात व्हॉईस ऑफ मिडियाचे पदाधिकारी कार्यरत असल्याचे व्हॉईस ऑफ मिडियाचे इंटरनॅशनल फोरमचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल म्हस्के यांनी यावेळी सांगितले. तर व्हॉईस ऑफ मिडिया आपल्या देशातच नव्हे तर ७६ देशातील पत्रकार आपल्या व्हॉईस ऑफ मिडीयाचे पदाधिकारी म्हणून शिस्तीने काम करत असून आपण आपल्या व्हॉईस ऑफ मिडियाच्या माध्यमातून पत्रकारांचा विमा , पत्रकारांच्या पाल्याचा शिक्षणाचा खर्च , पत्रकारांचा आणि पत्रकारांच्या कुटुंबाच्या आजाराचा खर्च व्हॉईस ऑफ मिडिया मार्फत करत असतो.असे व्हॉईस ऑफ मिडियाचे प्रदेश अध्यक्ष विजयजी चोरडिया यांनी यावेळी सांगितले. यावेळी अनेक वक्त्यांनी उपस्थित पत्रकारांना मोलाचे मार्गदर्शन केले. व्हॉईस ऑफ मिडियाचे कार्य आणि कामकाज पाहता अन्य संघटनेत असे काही केले जात नाही व्हॉईस ऑफ मिडियाचे माध्यमातून पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबासाठी झटणारी व्हॉईस ऑफ मिडीया तसेच संस्थापक अध्यक्ष आदरणीय संदीपजी काळे आणि त्यातील वरिष्ठ पदाधिकारी खरोखर गॉड फादर ची भूमिका निभावणारे असल्याचे उपस्थित पत्रकारांच्या निदर्शनास आल्याने ह्या केडर कॅम्प मुळे पत्रकारांच्या अपेक्षा उंचावल्या असल्याने सर्वच पत्रकार व्हॉईस ऑफ मिडीयाचा हक्काचा माणूस म्हणून काम करणार यात शंका नाही. असेही पत्रकारात जोरदार चर्चा रंगल्याचे चित्र होते. तर
अगदी कमी वेळात उत्तर महाराष्ट्रातील विभागासाठी अर्थात पाच जिल्ह्यातील पदाधिकारी ,पत्रकार एकत्र आणून नाशिक कुंभ नगरीत कार्यक्रम घडवून आणणे ही तारेवरची कसरत होती. ही कसरत पार करून कार्यक्रमाचे उत्तम नियोजन , उत्तम भोजन व्यवस्था करून विशेष म्हणजे कार्यक्रमाचे अध्यक्ष , प्रमुख पाहुणे उपस्थित पत्रकार बंधूंमध्ये दमदार जोश टिकून ठेवून कार्यक्रमास खीळवून ठेवणारे पत्रकारितेतील महामहीम आणि व्हॉईस ऑफ मिडियाचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख आदरणीय दिलीप साळुंखे यांनी उपस्थितांची मने जिंकली. हिच खरी साळुंखे सरांची मेहनतीची खरी पावती असल्याचे उपस्थित पत्रकारांच्या कार्यक्रमाच्या शेवट पर्यंत उपस्थिती वरून समजले. धन्य ते साळुंखे सर … त्यांचे खूप खूप आभार. …!





