भारतराज पवार : राज्य मुख्यसंपादक : क.टा. महाराष्ट्र न्यूज : ९१५८४१७१३१ मुंबई : क.टा. महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन न्यूज चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : लोकशाही पध्दतीने आंदोलन करून आपल्या मागण्या मान्य करून घेणाऱ्या एम.पी.एस.सी. च्या सर्व आंदोलक विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. हा विद्यार्थी एकजुटीचा ऐतिहासिक विजय विजय आहे. असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष उदयकुमार आहेर यांनी म्हटले आहे. खंबीर कणखर , निर्भीड आणि कायदेशीर मार्गाने चालणारे अधिकारी तुकाराम मुंढे यांची चौकशी समितीवर सचिव पदी नियुक्ती करण्यात आल्याने चौकशीत निश्चितच पारदर्शकता असणार असेही मत आहेर यांनी महाराष्ट्र न्यूज शी व्यक्त केले.
राज्य सरकारने सदरचा विषय हा अतिशय संवेदनशील पद्धतीने हाताळला .त्यासाठी मुख्यमंत्री ना. देवेन्द्रजी फडणवीस , उपमुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे , उपमुख्यमंत्री ना. श्रीमती. सुनेत्रा वहीनी अजितदादा पवार यांचेही मनःपूर्वक अभिनंदन उदयकुमार आहेर यांनी केले आहे.





