भारतराज पवार : राज्य मुख्यसंपादक : ९१५८४१७१३१
देवळा : क.टा. महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन न्यूज चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : ग्राम शिक्षण समिती उमराणे संचलित महात्मा फुले विद्यालय, माळवाडी येथे १ ते ७ ऑक्टोबर दरम्यान वन्यजीव सप्ताह विविध उपक्रमांनी उत्साहात संपन्न झाला. 🐆 कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यालयाचे माननीय मुख्याध्यापक श्री. एस. डी. सोनजे सर यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत केले.
या कार्यक्रमासाठी देवळा तालुक्यातील वनविभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये सौ. द्रोपदा चौधरी (वनपाल, देवळा), श्री. देविदास चौधरी (वनपाल, उमराणे), सौ. जयश्री अहिरे (वनपाल, खर्डा), श्री. गंगाधर पवार (वनरक्षक, उमराणे), श्री. भूपेंद्र राठोड (वनरक्षक, डोंगरगाव), श्री. नामदेव ठाकरे (वनरक्षक, रामेश्वर), श्री. गोपाळ साबळे (वनरक्षक, खर्डा), सौ. अनिता केंद्रे (वनरक्षक, कुंभार्डे), सौ. कल्पना गांगुर्डे (वनरक्षक, वार्शी ), सौ. पुष्पांजली कोल्हे (वनरक्षक, शेरी) तसेच सौ. सुरेखा मरशिवणे (वनरक्षक, वाखारी) तसेच
उपसरपंच श्री. हेमंत बागुल, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामदास बागुल, पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष अनिल गोसावी ,विद्यालयाचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमात नाशिक वनविभागाच्या रेस्क्यू टीमचे सर्पमित्र श्री. वैभव भोगले यांनी विद्यार्थ्यांना सापांविषयी सविस्तर माहिती दिली. त्यांनी विविध प्रकारचे साप, विषारी व बिनविषारी साप यांची ओळख त्यांची नावे व सापांपासून घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी ही माहिती प्रोजेक्टरच्या माध्यमातून प्रत्यक्ष चित्रे व विडिओ दाखवून विद्यार्थ्यांना समजावून सांगितली .
भोगले यांनी बिबट्याविषयी ही विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण माहिती दिली. बिबट्या मानवी वस्तीकडे का येतो, बिबट्या दिसल्यास नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी कोणती काळजी घ्यावी, अशा विविध बाबींवर त्यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये वन्यजीवांविषयी जागरूकता निर्माण झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे उपशिक्षक श्री. पवार सर यांनी केले. त्यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.








