भारत पवार : राज्य मुख्यसंपादक : 9158417131
देवळा : क.टा. महाराष्ट्र न्यूज : दि.३०ऑगस्ट, २०२६ रोजी कला क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान, विद्यार्थ्यांमध्ये कलागुणांची जोपासना आणि कलेच्या माध्यमातून सामाजिक व शैक्षणिक जाणीव निर्माण केल्याबद्दल देवळा एज्युकेशन सोसायटीचे कलाशिक्षक डॉ. भारत रंगनाथ पवार यांचा कोकणी/कोकणा आदिवासी समाज सेवा संघ, नाशिक (महाराष्ट्र) यांच्या वतीने गुणवंत गुणगौरव सोहळ्यात त्यांचा गौरव करण्यात आला.
चित्रकला, कलाशिक्षण आणि सर्जनशीलतेच्या माध्यमातून डॉ.भारत पवार यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळवून देण्याचे कार्य केले आहे. त्यांच्या या योगदानाची दखल घेत संघटनेच्या वतीने हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करून सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी ना . नरहरी सीताराम झिरवाळ साहेब (मंत्री.अन्न व औषध प्रशासन विशेष सहाय्य विभाग महा. राज्य मुंबई),साक्रीचे आमदार मा.मंजुळाताई गावित,मा. रंजनाताई भानसी (मा. महापौर, नगरसेवक नाशिक महानगरपालिका), उपजिल्हाधिकारी मा.हिरामण झिरवाळ साहेब ,मा.एन.डी.गावित साहेब, मा.राम चौरे साहेब, मा.प्राचार्य अशोक बागुल सर.मा.के.के.गांगुर्डे सर, मा.प्रा.किसन ठाकरे सर,राज्याध्यक्ष जयवंत आनंदा गारे, कार्याध्यक्ष चिंतामण सावकळीराम गायकवाड, राज्यउपाध्यक्ष चेतन रामचंद्र खंडाईत, राज्यसचिव नामदेव लक्ष्मण ठाकरे, राज्यसहसचिव शिवाजी चिमणा ठाकरे, खजिनदार दत्तू गणपत साळवे, सहखजिनदार सरोजताई आनंद भोये, विधी प्रमुख गिरीधर लक्ष्मण खोतरे, प्रसिद्धी प्रमुख रमेश राजाराम सावके, विस्तार प्रमुख विमल काशिनाथ वाघुळ आणि संतोष मनोहर इंपाळ आदी पदाधिकारी उपस्थित होते.
डॉ.भारत पवार यांच्या सन्मानाबद्दल देवळा एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन आदरणीय मा.प्राचार्य. हितेंद्र आहेर (बापूसाहेब ), व्हा.चेअरमन आदरणीय श्रीमती आक्कासाहेब आहेर ,सचिव आदरणीय प्रोफेसर डॉ. मालतीताई आहेर मॅडम,प्रशासकीय अधिकारी आदरणीय प्रा.बापू रौंदळ सर,मुख्याध्यापिका सुनिता पगार मॅडम, पर्यवेक्षक श्री.कौतिक खोंडे सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले..





