Home Breaking आजोबांच्या स्मरणार्थ सोमनाथ शेवाळे यांच्याकडून फुले विद्यालयास आठ हजार पुस्तकांची भेट :...

आजोबांच्या स्मरणार्थ सोमनाथ शेवाळे यांच्याकडून फुले विद्यालयास आठ हजार पुस्तकांची भेट : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांत वाचन संस्कृती वाढावी हाच उद्देश : मुख्याध्यापक सोनजे

0
3

भारत पवार : राज्य मुख्यसंपादक : ९१५८४१७१३१

देवळा : क.टा. महाराष्ट्र न्यूज  : ऑनलाईन न्यूज चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क देवळा तालुक्यातील माळवाडी येथील रहिवासी व सध्या इन्फोसिस, पुणे येथे कार्यरत असलेले अभियंता सोमनाथ बाळू शेवाळे यांनी आजोबा कै. त्र्यंबक पुंडू शेवाळे यांच्या स्मरणार्थ विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी स्तुत्य उपक्रम राबविला.
सोमनाथ शेवाळे  यांनी  येथील महात्मा फुले. विद्यालयाच्या ग्रंथालयासाठी सुमारे ७ ते ८ हजार पुस्तके उपलब्ध करून दिली.या पुस्तकांमुळे विद्यार्थ्यांना विविध विषयांचे ज्ञान मिळण्यास तसेच वाचनाची आवड निर्माण होण्यास मोठी मदत होणार असल्याचे फुले विद्यालयाचे मुख्याध्यापक सोनजे यांनी कार्यक्रमात बोलतांना सांगितले.
याचबरोबर शेवाळे यांनी जि. प. माळवाडी, जि. प. फुले माळवडी आणि जि. प. नामदेववाडी येथील प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे  वाटप केले. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लावण्याच्या त्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या अधिकाधिक संधी उपलब्ध व्हाव्यात, वाचनसंस्कृती *वाढावी आणि विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानाची गोडी निर्माण व्हावी, या उद्देशाने केलेली ही मदत निश्चितच प्रेरणादायी आहे. आपल्या आजोबांच्या स्मृती जपत समाजातील विद्यार्थ्यांसाठी केलेल्या या शैक्षणिक योगदानातून ‘समाजासाठी काहीतरी देणे’ ही सामाजिक बांधिलकी अधोरेखित झाली आहे.
शेवाळे यांच्या या उपक्रमाबद्दल ग्राम शिक्षण समिती संचलित संस्थेचे महात्मा फुले विद्यालय, माळवाडी शाळेचे मा. चेअरमन, सचिव, सर्व संचालक मंडळ व मुख्याध्यापक श्री एस. डी.सोनजे सर यांनी  तसेच  प्राथमिक शाळांच्या शिक्षक, विद्यार्थी व पालकांनीही शेवाळे यांचे आभार मानून कौतुक केले.

Oplus_131072

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here