भारत पवार : मुख्य संपादक : ९१५८४१७१३१ मुंबई : क.टा. महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन न्यूज चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : स्व.अजितदादा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र करण्यात मोठा सिंहाचा वाटा आहे. हा पक्ष तयार करताना त्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागला होता. हे आजचे नेते कदाचित विसरले असतील पण त्यांचा आत्मा तरी विसरला नसणार हे लक्षात ठेवून किमान कुठेतरी ईमानदारी शिल्लक असणार किंवा आजच्या अनेक नेते मंडळी आणि कार्यकर्त्यांना याची जाणीव नक्कीच असणार की राष्ट्रवादी काँग्रेस स्वंतत्र तयार करण्यासाठी अजितदादा यांना किती तरी संकटाना सामोरे जाऊन तोंड द्यावे लागले. त्यामुळे आजच्या नेत्यांनी स्वतःच्या हितासाठी चुकीच्या पद्धतीने न जाता राष्ट्रवादी काँग्रेसपक्ष अजितदादा पवार यांच्या निधना नंतर सुनेत्रा वहिनी , पार्थदादा आणि जयदादा पवार यांच्याशिवाय अन्य कोणत्याही नेत्याचा नाही याची सुज्ञ नेत्यांनी जाणीव ठेऊन कार्यकर्त्यांचा विश्वासघात करू नये असे सणसणीत आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष उदयकुमार आहेर यांनी केले आहे.
पक्षा बाबत बोलतांना आहेर यांनी पुढे सांगितले की, परवाच्या दिवशी रायगड जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात नुकतीच काही नेत्यांची बैठक झाली त्यावेळी सुनेत्रा पवार ( वहिनी ) , पार्थदादा व जयदादा पवार यांना विश्वासात न घेता त्यांनी त्या नेत्यांनी बैठकीस न बोलवता बैठक घेतली ती आम्हाला मान्य नाही आणि ह्या नेत्यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्या आजच्या उपमुख्य मंत्री सुनेत्रा वहिनी यांचा विश्वासघात केला हे मात्र चुकीचे असून कार्यकर्त्यांचा ही विश्वासघात करणे थांबवावे असेही पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष उदयकुमार आहेर यांनी सांगितले.असून रायगड जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात सुनेत्रा वहिनी , पार्थदादा आणि जयदादा यांना डावलून झालेली बैठक आम्हास मान्य नसून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सुनेत्रा पवार वहिनी , पार्थदादा,जयदादा पवार यांचाच असून कार्यकर्त्यांनी आणि जनतेने अन्य नेत्यांवर विश्वास ठेवू नये असे आवाहनही आहेर यांनी केले.
अजितदादा यांच्या निधनानंतर खरे तर सर्व सुज्ञ नेत्यांनी सुनेत्रा वहिनी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना आधार देण्याची खरी गरज आहे .परंतु काही नेते त्यांना डावलून स्व हितासाठी बैठका घेतात हा घोर अन्याय आम्ही खपवून घेणार नाही आणि हे काय खरे होणार नाही असेही उदय आहेर यांनी शेवटी सांगितले.






