भारत पवार : राज्य मुख्यसंपादक : ९१५८४१७१३१ लातूर : क.टा. महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन न्यूज चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : लातुर मधील, रेती, मुरुम, खडी दगड वाहतुक करणाऱ्या वाहान चालकावर आवास्तव, ऑनलाइन दंड लावणाऱ्या RTO कार्यालयातील मुजोर,घमंडी मस्तवाल अधिकाऱ्यांच्या निषेधार्थ, प्रादेशिक परिवहन अधिकार RTO लातुर यांच्या तोंडाला काळे फासून त्यांची गाढवावर बसवुन धिंड काढणार असल्याचे निवेदन स्वातंत्र्य सैनिक प्रदीप पाटील खंडापुरकर बाबा राष्ट्रीय अध्यक्ष यांनी आरटीओ यांना दिले. विशेष म्हणजे ज्यांना काळे फासून गाढवावर बसून धिंड काढणार त्यांनाच निवेदन दिले आणि त्याच आरटीओ ने निवेदन स्वीकारल्याने त्यांची मोठी नाचक्की झाल्याचे बोलले जात आहे.
लातुर मधील रेती, मुरुम, खडी,दगड वाहतुक करणाऱ्या वाहान चालकावर केवळ चिरीमीरी कमी दिली म्हणून प्रचंड मोठ्या प्रमाणात ऑनलाइन दंड वसूल करणाऱ्या प्रादेशिक परिवहन कार्यालयातील( RTO) लातुर मधील अधिकार्यांच्या निषेधार्थ दिनांक 18 मार्च वार बुधवार रोजी सकाळी 11.30 वाजता प्रादेशिक परिवहन अधिकार विनोद चव्हाण यांच्या “तोंडाला काळे फासून त्यांची गाढवावर बसवुन धिंड काढणार” आसल्याचे निवेदन अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वातंत्र्य सैनिक प्रदीप पाटील खंडापुरकर बाबा यांनी आज RTO विनोद चव्हाण यांना दिले.
राष्ट्रीय अध्यक्ष बाबा आपल्या निवेदनात म्हणतात लातुर हा शांत आणी शिस्तप्रिय जिल्हा आहे,जो अधिकारी लातुर येथे येतो तो कायमस्वरुपी लातुर लाच वास्तव करतो, लातूर मधील राजकारणी कोणाही अधिकार्यांना त्रास देत नाहीत, आणी लातुर मधील जनताही कोणा अधिकार्यांना त्रास देत नाही
पण गेल्या कांही महीन्या पासून RTO ऑफिस मधील अधिकारी रेती, मुरुम, दगड, खडी वाहतुक करणाऱ्या ट्रक, हायवा, टिप्पर च्या मालकास, त्यांच्या ड्राइवर ला जास्त हेवी रेती, दगड, मुरुम भरला म्हणून त्याला आई, बहीनी वर शिवीगाळ करीत आहेत, त्यांनी कोणा राजकारणी व्यक्तीला बोलु नये म्हणून या अधिकार्याच्या वाहाना वरिल तुटका ड्रायव्हर त्यांचा मोबाईल जप्त करीत आहेत आणी हे वाहन वजन काट्यावर घेऊन जास्तीचे साहित्य भरले म्हणून 38 ते 40 हजार रुपयाचा ऑनलाइन दंड लावत आहेत आणी गाडी जप्त करीतआहेत, आगोदर च हे वाहान वाले तहसील कार्यालयाच्या त्रासाला कंटाळून गेले आहेत, आणी पुन्हा RTO ऑफिस च्या रझाकारी दंडा मुळे पुर्णता होरपळून निघत आहेत,आणी यांच्या आवास्तव ऑनलाइन च्या दंडा मुळे बर्याच वाहान चालकांनी आपले वाहान ट्रक, टिप्पर, हायवा विकुन टाकले आहेत.
या RTO कार्यालयातील अधिकार्यांच्या त्रासा मुळे लातुर मधील बांधकाम व्यवसायाला खिळ बसली आहे, बांधकाम व्यवसाय पुर्णपणे बंद पडण्याच्या मार्गावर आला आहे,हे RTO ऑफिस लातुर मध्ये आलेले बाहेरील अधिकारी लातुर चे वैभव नष्ट करण्याच्या प्रयत्नात आहेत,जर हे खरेच प्रामाणिक आसतील, कोणाचेही पैस घेत नसतील तर मी यांचे चरणस्पर्श करायला तयार आहे,त्यांनी आपल्या लेकरांच्या डोक्यावर हाथ ठेवुन शपथ खावी की मी चोर नाही, लाच खात नाही, हे काय आहेत आपणास माहीतच आहे.
तसेच मिनी डोर लहान टेम्पो, टमटम वाल्यांना जास्त माणसे, जास्त साहित्य भरले म्हणून त्यांना 18 ते 20 हजार रुपयाचा ऑनलाइन दंड लावला जात आहे.
RTO ऑफिस मधील या मस्तवाल, घमंडी, मुजोर, भाडखाणाऱ्या अधिकार्यांच्या निषेधार्थ अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतिने दिनांक 18 मार्च वार बुधवार रोजी सकाळी 11.30 वाजता कार्यकर्ते, वाहन चालक यांच्या सह प्रादेशिक परिवहन अधिकार RT0 लातुर यांच्या तोंडाला काळे फासून त्यांची गाढवावर बसवुन धिंड काढण्यात येणार आहे.





