भारत पवार : मुख्य संपादक : ९१५८४१७१३१ “ देवळा : क. टा. महाराष्ट्र न्यूज ऑनलाइन न्यूज चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : ” यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र ”
काम करून घामाने ओथंबलेली महिला ही अधिक सुंदर दिसते कारण आपल्या दिसण्यापेक्षा आपल्या असण्याला आपण प्राधान्य दिलं तर यश नक्की मिळते.
शितल कुयटे ( मंडळ अधिकारी)
देवळा येथील जिजामाता कन्या विद्यालयात १० मार्च, २०२६ रोजी जागतिक महिला दिन व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित कर्तृत्ववान आदर्श महिला सन्मान पुरस्कार नुकताच संपन्न झाला. काम करून घामाने ओथंबलेली महिला ही अधिक सुंदर दिसते कारण आपल्या दिसण्या पेक्षा आपल्या असण्याला आपण प्राधान्य दिल तर यश नक्की मिळते असे गौरवोदगार चांदवड येथील मंडळ अधिकारी शितल कुयटे यांनी काढले. देवळा येथील जिजामाता कन्या विद्यालयात कर्तुत्ववान आदर्श महिला सन्मान पुरस्कार कार्यक्रमा प्रसंगी कुयटे बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रोफेसर डॉ.मालतीताई आहेर, प्रमुख पाहुणे सुरेश पवार अध्यक्ष गिरणा गौरव प्रतिष्ठान,प्राचार्य डॉ.हितेंद्र आहेर (बापूसाहेब),मुख्याध्यापिका श्रीमती सुनिता पगार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.पाहुण्यांचा परिचय पर्यवेक्षक श्री.के.एम.खोंडे सर यांनी केला.संस्थेच्या वतीने देवळा नगरपंचायत सफाई कामगार महिलांचा सन्मान करण्यात आला त्यात संगीता सोनगत,अनिता पवार, पूजा पवार, मनिषा शिरसाठ,कांचन गोयल, सुरेखा वाघ, अनिता माळी, सुशिला घोडेस्वार, रेखा देवरे, जागृती गोयल, हौसाबाई साळूंखे, सिमा पवार, हौसाबाई जगताप, गंगुबाई धुळे, कुसुम गायकवाड, अनिता साळुंखे, कविता गुजरे,तसेच वैद्यकीय,शिक्षण,सामाजिक कार्य या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला त्यात श्रीमती ज्योती गुंजाळ,अर्चना आहेर, डॉ.नूतन देवरे, मानसी अहिरे, ऋतुजा पवार, सपना देवरे, माधुरी मोरे,अनिशा देवरे, लिना अहिरराव,यांसह ३१ महिलांचा समावेश होता.प्रमुख पाहुणे सुरेश पवार यांनी सफाई कर्मचारी महिला यांच्या सन्मानाबद्दल संस्थेचे कौतुक केले. सन्मानार्थी मनोगतात मानसी अहिरे,डॉ.पूनम देवरे,अर्चना आहेर इत्यादींनी या उपक्रमाबद्दल गौरवोद्गार काढले.विद्यालयातील विद्यार्थिनींनी विविध वेशभूषा धारण करत कार्यक्रमाचे आकर्षण वाढवले तर कलाशिक्षक भारत पवार यांचे फलक लेखन आणि संजय आहेर,नंदकिशोर रौंदळ व गीत मंचाने सादर केलेल्या स्वागत गीताने कार्यक्रमात रंगत वाढवली.प्रमुख पाहुण्यांनी गीत मंचाचे विशेष कौतुक केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन के.एन.दातरे तर पुरस्कार वितरण संयोजन एस.टी.पाटील यांनी केले.आभार प्रदर्शन एल. एस.करवंदे यांनी केले.कार्यक्रम यशस्वितेसाठी विद्या भामरे,डी. एच.जगताप,एस.एन. आहेर,पंकज जाधव,हेमंत मांडवडे,शितल देवरे,संगीता दाभाडे,.किशोर वसावे,नंदिनी सांबरे,अरुण आहेर,डी.ई. देवरे,यांनी मेहनत घेतली.





