भारतराज पवार : मुख्य संपादक कमी वेळात जास्तीतजास्त मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी नक्कीच संपर्क करा. आमचे लिखाण ” ऑनलाईन न्यूज चॅनल द्वारे ” मतदारांच्या घराघरात आणि घरातील प्रत्येकाच्या मनामनात असणार संधी गमवू नका.आज नाही तर कधीच नाही.म्हणून आजच संपर्क करा. ” महाराष्ट्र न्यूज ” मो. ९१५८४१७१३१ मालेगाव : क.टा. महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन न्यूज चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : मालेगाव महानगर पालिकेची निवडणुकीची रणधुमाळी जोरदार बहरत चालली असून अगदी थंडीच्या तडाख्यात उमेदवारांना मतदारांच्या भेटीस जावे लागते आहे. त्यामुळे जीवाची बाजी लाऊन आपणच आपले नशीब उजळवणार अशी समज प्रत्येक उमेदवाराने करून घेतलेली दिसते तर काही उमेदवार नाममात्र अर्ज भरून थोडे फार का होईना खिशात पाडून घेऊ ह्या चांगल्या हेतूने उमेदवारी अर्ज दाखल करून मात्र माघार घेऊ असाही बोलबाला चर्चिला जात आहे. भाजपाचे शहर अध्यक्ष देवा पाटील यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी पाटील यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत भाजपा पक्षा तर्फे अर्ज दाखल केला असून त्यांच्या समवेत भाजपाचे अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. कधी नव्हे एवढे जंगी शक्ती प्रदर्शन देवा पाटील यांनी आज घडून आणले. प्रभाग क्रमांक १० मधून पाटील उमेदवारी करणार असून मात्र हा प्रभाग गेल्या १० ते १५ वर्षांपासून समस्या ग्रस्त असून अशा समस्या ग्रस्तांना देवा भाऊ कसे सामोरे जातात व स्वतःच्या नशिबाची चावी समस्याग्रस्तांकडून कधी फिरवून घेतात याबाबत आज सांगणे मुश्किलच आहे. तर दुसरीकडे युती साठीचे पत्ते अजून ओपन झाले नसले तरी देवा भाऊ यांनी भाजप तर्फे उमेदवारी करण्यात नंबर वन ठरले आहेत.





