मालेगाव : क.टा. महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन न्यूज चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : _
मालेगाव- येथील सेवानिवृत्त प्रा. व्ही. सी. सोनार (८७) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. आज (दि. २९ डिसेंबर) संध्याकाळी ८ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
सुरुवातीला लोकमान्य हायस्कूल, केबीएच विद्यालय, बीएड महाविद्यालय नंतर महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालयात नोकरी केली. मराठी, इंग्रजी व इतिहास हे त्यांचे अभ्यासाचे विषय होते .विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून त्यांची ख्याती होती. राष्ट्र सेवा दल, सानेगुरुजी रुग्णालय, श्रध्देय एस एम जोशी कॅम्प सार्वजनिक वाचनालय, मालेगाव मराठी साहित्य संघ आदी संस्था उभारण्यात त्यांचा मोठा सहभाग होता. कवी व लेखक म्हणून त्यांना प्रा. विलास सोनार या नावाने ओळखले जात होते . महाराष्ट्रातील अनेक वृत्तपत्रात व पुस्तकांमध्ये त्यांचे लिखाण प्रकाशित झाले आहे.
पत्रकार रविराज सोनार यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, २ नाती, पुतणे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने मालेगाव शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शिस्तीचे आणि विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांच्या काळात नोकरी मध्ये त्यांनी मोठा दरारा निर्माण केला होता. अशा विद्यार्थी प्रिय शिक्षकास कसमादे टाइम्स ( साप्ताहिक वृत्तपत्र ) आणि महाराष्ट्र न्यूज ( ऑनलाईन न्यूज चॅनल ) परिवारातर्फे भावपुर्ण श्रद्धांजली…





