Home Breaking कर्मवीर रामरावजी आहेर यांच्या स्मृतिदिनानिमित्त देवळा येथे अनेक कार्यक्रमांचे आयोजन

कर्मवीर रामरावजी आहेर यांच्या स्मृतिदिनानिमित्त देवळा येथे अनेक कार्यक्रमांचे आयोजन

0
43
Oplus_131072

भारतराज पवार : मुख्य संपादक                              संपर्क :  ९१५८४१७१३१.                                         देवळा : ( दि. १) _ क.टा. महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन न्यूज चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क नाशिक जिल्ह्यातील देवळा येथील कर्मवीर रामरावजी आहेर यांच्या ३२ व्या स्मृतिदिनानिमित्त महाविद्यालयाच्या भव्य प्रांगणात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून ह्या भव्य कार्यक्रमांचा लाभ पंचक्रोशीतील सर्व नागरिकांनी , सर्व विद्यार्थ्यांनी , विद्यार्थिनींनी घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.                              कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक विभागाचे माजी पोलिस महानिरीक्षक ( IPS )  मा.डॉ.प्रतापराव दिघावकर उपस्थित राहणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष देवळा एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मा .प्राचार्य डॉ.हितेंद्र रामराव आहेर उपस्थित राहून मान्यवरांचे स्वागत व सत्कार करणार असल्याचे सांगण्यात आले. तर समारंभात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गुणी विद्यार्थी , शिक्षक, प्राध्यापक आणि मा. रवींद्र दशपुते ( शिक्षण व उद्योजकता ) , मा.संजय हिरे (  उद्योजकता )  यांचा विशेष गुणवंत म्हणून गौरविले जाणार असल्याचे समस्त आयोजकांनी महाराष्ट्र न्यूज शी बोलतांना सांगून ह्या समारंभात सगळ्यांनी सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here