नाशिक : क. टा. महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन न्यूज चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क _ नाशिक जिल्ह्याचे आदिवासी विकास आयुक्त आणि जिल्हा परिषदेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या मातोश्री विजया मोरेश्वर बनसोड वयाच्या ९१ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुली , मुलगा , सुन , नातवंडे असा मोठा परिवार आहे. नाशिक येथील अमरधान मध्ये त्यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राजकीय , प्रशासकीय , पत्रकार असे सर्वच स्तरातील मान्यवर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. महाराष्ट्र न्यूज चे संपादक भारत पवार तसेच कसमादे टाइम्स ( साप्ताहिक) चे पत्रकार आणि परिवार आयुक्त बनसोडे मॅडम यांच्या दुःखात सहभागी असून , मातोश्री विजया बनसोड यांना भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करून परमेश्वर आयुक्त बनसोड मॅडम आणि समस्त परिवारास दुःख सहन करण्याची शक्ती देओ अशी प्रार्थना व्यक्त केली.





