भारतराज पवार : राज्य मुख्यसंपादक तथा महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष _ लोकहित माहिती अधिकार पत्रकार पोलिस संरक्षण संघटना. कमी वेळात आपल्या मतदार संघातील ,प्रभागातील वार्डातील, गटातील आणि गणातील मतदारांच्या घराघरात आणि घरातील प्रत्येकाच्या मनामनात काही सेकंदात पोहोचण्यासाठी आजच आपली मुलाखत , बातमी साठी हक्काचे ऑनलाईन न्यूज चॅनल ” महाराष्ट्र न्यूज” शी बिनधास्त संपर्क करा. संपर्क : महाराष्ट्र न्यूज : मुख्य संपादक _ 9158417131. मालेगाव : क.टा. महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन न्यूज चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : मालेगाव महापालिका निवडणूकीत राष्ट्रीय मराठा पार्टी उमेदवारी करणार….
प्रभागातील समस्या कायमस्वरुपी सोडवून प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी उमेदवारीचा निर्धारः आंशुराज राजेंद्र राऊत
मालेगाव शहरातील प्रभाग क्रमांक १० हा सर्वात मोठा व विविध समस्यांनी ग्रासलेला प्रभाग असून, या प्रभागातील नागरिकांच्या हक्काच्या मुलभूत सुविधा या प्रभागातील नागरिकांना वर्षानुवर्षापासून लाभलेल्या नाहीत, अनेक नगरसेवक ह्या प्रभागातून येथील जनतेने निवडून दिलेत. निवडून आलेल्या नगरसेवकांनी आजपावेतो प्रभागातील मतदारांना अपेक्षेवरच झुलवत ठेवले. त्यामुळे विकास कामांचा आजही ह्या प्रभागात अगदी बट्ट्याबोळच आहे . ह्या बट्ट्याबोळचा नायनाट करून जनतेसाठी आपण जनविकास आपला प्रभागाचा विकास , स्वछ प्रभाग , सुंदर प्रभाग ही संकल्पना घेऊन मी प्रभागातील समस्त जनतेच्या , महिलांच्या , तरुण , तरुणींचा विकासासाठी आपण काहीतरी करून दाखवावे हा हेतू ठेवून आणि माझे वडील राजेंद्र राऊत पाटील पत्रकार असल्या कारणाने प्रभागातील समस्या आणि त्या सोडविण्यासाठी त्यांची सुद्धा मनापासून तळमळ असल्या कारणाने मी राष्ट्रीय मराठा पार्टी कडून प्रभाग क्रमांक १० मधून उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रभागातील सर्व माझ्या बंधू , भगिनी , माझे आई , बाबा यांनी मला भरभरून मतदान रुपी आशीर्वाद देऊन आपला विकास , आपल्या प्रभागाच्या विकासाला गती द्या. आपल्या -हकाच्या सोयी सुविधापासून आपण सर्व वंचित असल्याने व प्रभागाचा विकास हा झालेला नसल्याने आपण आगामी महापालिकेच्या निवडणूकीत अधिकृत उमेदवारी करणार असा ठाम निर्धार अंशुराज राऊत यांनी महाराष्ट्र न्यूज ह्या न्यूज चॅनलशी बोलतांना सांगितले. राऊत यांनी पुढे सांगितले की , आपला मुळातच जन्म हा प्रभाग क्रमांक १० मधील शिवाजीवाडीत ( छत्रपती शिवाजी महाराज वाडी ) झालेला आहे. शिवाजीवाडीसह गणेशवाडी रचना नगर, मोची कॉर्नर, क्रांतीनगर हा संपूर्ण परिसर मजुर वर्गाचा बालेकिल्ला असून या प्रभागात अनेक स्वरुपाच्या समस्या आजतागायत तशाच आहेत. त्या प्रामाणिकपणे सोडविण्याचा कोणीही प्रयत्न केलेला नाही. प्रभागात महिला व पुरुषांच्या शौचालयांची पुरती दुर्दशा झालेली आहे. कामगार वस्ती चा परिसर असलेल्या या भागात महिला वर्गाची अक्षरशः तारांबळ उडत आहे. त्याशिवाय प्रभागातील अस्वच्छता महिला वर्गाची अक्षरशः डोकेदुखी ठरत आहे. त्याशिवाय प्रभागातील स्वच्छता हा नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे. स्वच्छताच राहत नसल्याने परिणामी या प्रभागातल्या कामगार वस्त्यामध्ये नेहमीच आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो व त्याचे दुष्परिणाम सामान्य नागरिकांना भोगावे लागतात. परंतु महानगरपालिकेत निवडून गेलेले लोकप्रतिनिधी मुद्दामहून या सर्व प्रकाराकडे दुर्लक्ष करतात त्यामुळेच हा प्रभाग वर्षानुवर्षापासून सोयी सुविधांपासून वंचित राहिलेला आहे. आपला जन्म हा एका सामान्य व धार्मिक कुटुंबात झालेला असल्याने त्याशिवाय प्रभागातील गोरगरिब नागरिकांच्या सुख, दुःखाची आपणाला जवळून जाणीव असल्याने आपणही उमेदवारी करीत असल्याचे राऊत यांनी सांगितले. शिवाय अंशुराज राऊत यांचे आजोबा स्वर्गीय ह.ब.प.रघुवीर बाबा तायडे वऱ्हाडकर यांनी प्रभाग क्रमांक १० मध्ये धार्मिक संस्कार रुजविण्याचे महान कार्य केलेले असून त्यांनी प्रभाग १० मध्ये विठ्ठल मंदिराची निर्मिती करुन मंदिराचे काम पुर्ण केलेले आहे. त्याशिवाय प्रभाग १०मधील कामगारांची मुले मुली शिक्षित होऊन सुसंस्कारीत व्हावेत म्हणून रघुवीर बाल विद्या प्रसारक मंडळ शिक्षण संस्थेची स्थापना करुन अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य घडविलेले आहे. अशा या प्रभाग क्रमांक १० मधील कामगारांच्या, मोलमजुरांच्या प्रश्नांची, समस्यांची जाण असलेल्या राऊत या सगळ्या वार्डातील बंधू भगिनी जेष्ठ वडीलधाऱ्या नागरिकांच्या आशीर्वादाने व पाठबळावर ही उमेदवारी करीत आहेत. प्रभागाचा विकास व समस्यामुक्त प्रभाग बनवून स्वच्छ व सुंदर प्रभाग करण्याची आपली संकल्पना असल्याचे शेवटी युवा उमेदवार आंशुराज राऊत यांनी सांगितले.






