Home Breaking मोशी येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शनास भऊर येथील शेतकऱ्यांनी दिली भेट...

मोशी येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शनास भऊर येथील शेतकऱ्यांनी दिली भेट , शेतकऱ्यांचा भरघोस प्रतिसाद ! कुबेर जाधव यांनी आयोजकांचे मानले आभार

0
50
Oplus_131072

भारतराज पवार  : राज्य मुख्यसंपादक   तथा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष _ लोकहित माहिती अधिकार पत्रकार पोलिस संरक्षण संघटना  , संपर्क : ९१५८४१७१३१.                                                देवळा :  क.टा. महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन न्यूज चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : मोशी ( पुणे ) येथील आंतरराष्ट्रीयकृषी प्रदर्शनास विविध राज्यातून शेतकऱ्यांनी भेट देऊन  भरघोस प्रतिसाद दिला. तर नाशिक जिल्ह्यातील  देवळा तालुक्यातील भऊर येथील ५० शेतकऱ्यांनी दिली भेट.  मोशी पुणे येथे आयोजित केलेले राष्ट्रीय कृषी प्रदर्शन पाहण्याची संधी भउर येथील डॉ जे डी पवार सेवा सहकारी संस्थेच्या वतीने मोशी ( पुणे) येथे झालेल्या प्रदर्शन पहान्याची संधी उपलब्ध करून दिली, मोशी येथे भव्य जागेवर आयोजित आंतरराष्ट्रीय क्रुषी प्रदर्शन दि,१० ते १४ तारखे पर्यंत आयोजित करण्यात आलं होतं.पाच दिवसीय क्रुषी पर्दशनास लाखो शेतकऱ्यांनी भेट दिली,त्या अनुषंगाने डॉ शैलेश दादा पवार यांच्या सौजन्याने भउर गावातील ५५ उधमशिल शेतकऱ्यांनी एकत्र येऊन भेट देत प्रदर्शनातील विविध क्रुषी दालनांना भेट देऊन माहिती जाणून घेतली ही संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल विठेवाडी येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते कुबेर जाधव यांनी आयोजकांचे आभार मानले,
या प्रवासाचे मुख्य आकर्षण म्हणजे तेथील कृषी क्षेत्रातील नवतंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष परिचय. प्रदर्शनात अनेक विभागांमध्ये शेतीशी संबंधित विविध साधने, उपकरणे व यंत्रसामग्री पाहावयास मिळाली. **शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान व यांत्रिकीकरणाची प्रगती किती झपाट्याने होत आहे विशेषतः प्रदर्शन बघीतल्यावर जाणवले.** आधुनिक ट्रॅक्टर मॉडेल्स,रोटेव्हेटर, मळणी व पेरणी यंत्र ड्रोनद्वारे औषध फवारणी, स्वयंचलित नांगरणी साधने, गवत पॅकिंग व कटिंग यंत्रे, आधुनिक शेड नेट व पाली हाउस,सौर उर्जा व त्यांच्या वापर करन्यासाठी लागनारे मटेरियल,स्मार्ट फवारणी यंत्रणा, अशा अनेक उपकरणांचा प्रत्यक्ष अनुभव शेतकऱ्यांना घेता आला.
या वेळी डॉ जे डी पवार विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे चेअरमन श्री दिपक पवार, तसेच डॉ शैलेश दादा पवार यांनी शेतकऱ्यांसाठी वातानुकूलित लक्झरी बसची व्यवस्था करुन दिली होती, , *विशेष बाब म्हणजे सोना अग्रोटेक ( शेड नेट) चे फिल्ड आफिसर बाबा पवार ( पत्रकार ) यांनी उपस्थित ५५ शेतकऱ्यांना मोफत प्रवेश परवाने( पास) उपलब्ध करून दिले होते, दिपक पवार, व कवी आभा, आहेर यांनी क्रुषी यात्रेचे छान नियोजन केले होते,तर क्रुषी अभ्यासक श्री कुबेर जाधव यांनी आयोजकांचे आभार मानले*, या क्रुषी प्रर्दशनासठी भउर गावातील, जेष्ठ शेतकरी, काशिनाथ पवार, दौलत पवार, रविंद्र पवार, विजय पवार, हरी चंद्र पवार, बाळासाहेब, रामभाऊ आहेर,बापु सर,प्रकाश पवार, सुनिल पवार, अमोल पवार, गंगाधर पवार, भाऊसाहेब आहेर, राजेंद्र पवार, आदी शेतकरी उपस्थित होते,
ठळक निरीक्षणे 
एकूणच, मोशी येथील कृषी प्रदर्शनाने कृषीविषयक दृष्टीकोनात सकारात्मक बदल जानवला. आधुनिक तंत्रज्ञान, नवकल्पना व भावी काळातील आधुनिक शेतीचे दिशादर्शक मार्गदकर्शन अनुभवता आले.                 कुबेर जाधव : फोटो्् मोशी पुणे येथील क्रुषी प्रर्दशनासठी भउर येथील उपस्थित शेतकरी बांधव .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here