भारतराज पवार : मुख्य संपादक मो.९१५८४२७१३१
देवळा : क.टा.महाराष्ट्र न्यूज : ऑनलाइन न्यूज चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : देवळा तालुक्यातील दहिवड येथील कै.लक्ष्मीबाई देवरे विद्यालय येथे संपन्न झालेल्या तालुकास्तरीय 22 व्या विज्ञान प्रदर्शनात भावडे येथील एस.के.डी. चारिटेबल ट्रस्ट नाशिक, संचलित व्हि.के.डी. इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज भावडे येथील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. विद्यालयाचे विद्यार्थी यशराज वैद्य,उत्कर्ष शेवाळे यांनी प्रदर्शनात सादर केलेल्या “चाइल्ड प्रोटेक्शन डिवाइस” या उपकरणाला तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळाला. प्रदर्शनात तालुक्यातील मोठ्या संख्येने शाळांनी सहभाग नोंदविला. विजयी विद्यार्थ्यांना विद्यालयाचे विज्ञान शिक्षक प्रदीप जाधव व सीमा अहिरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.यशस्वी विद्यार्थ्यांना व शिक्षकांना परीक्षा मंडळाचे विभागीय सहसचिव मच्छिंद्र कदम, उपशिक्षणाधिकारी नरेश पाटील यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.विद्यालयाचे प्राचार्य एन.के.वाघ तसेच संस्थेचे अध्यक्ष संजय देवरे, आकाश पोल्ट्री प्रायव्हेट लिमिटेड चे डायरेक्टर पोपट देवरे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले. यशस्वी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे संस्थेच्या सेक्रेटरी मीना देवरे,सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बबलू देवरे, सागर कैलास, हेमंत शिंदे यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.





