भारतराज पवार : राज्य मुख्यसंपादक तथा महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष _ लोकहित माहिती अधिकार पत्रकार पोलिस संरक्षण संघटना. संपर्क : 9158417131 मुंबई : क.टा. महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन न्यूज चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : महाराष्ट्र राज्यातील महानगरपालिकांचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून राज्यात आचार संहिता लागू करण्यात आली आहे. नगरपालिका , नगरपरिषदांच्या आणि सध्या होऊ घातलेल्या महानगरपालिकांच्या निवडणुकीत विजयाचा गुलाल कोण उधळणार हे 16 जानेवारी 026 रोजी कळणार असल्याची माहिती राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक कार्यक्रम घोषित केला.
राज्यात 15 डिसेंबर 025 पासून आचार संहिता लागू झाली असून 15 जानेवारी 026 रोजी मतदान तर 16 जाने. 026 रोजी निकाल घोषित होणार. महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांसाठी 3 कोटी 48 लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
ओबीसी आरक्षण मुद्द्यांवर राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुका गेल्या सहा ते सात वर्षांपासून लांबणीवर पडल्या होत्या .सर्वोच्च न्यायाच्या आदेशा नंतर महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला.त्यामुळे गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असणाऱ्यांना निवडणूक आखाडा मोकळा झाला आहे.
निवडणुकी साठी उमेदवारी अर्ज फक्त ऑफलाईन पद्धतीने भरता येणार असल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले.ज्या उमेदवाराकडे सध्या जात वैधता प्रमाणपत्र नसेल तर त्यांनी सहा महिन्याच्या आत सादर करावे.
मुंबई महानगर पालिकेमध्ये एक सदस्यीय वॉर्ड असल्याने तेथील मतदारांना एकच मत देण्याचा अधिकार आहे.उर्वरित महानगरपालिकांसाठी एक ते पाच सदस्यीय वॉर्ड असल्याने तेथील मतदारांना त्यानुसार मतदान करावे लागणार.महानगर पालिकेच्या निवडणुकांसाठी 1 जुलै 025 रोजीची मतदान यादी ग्राह्य धरली जाणार असल्याचेही आयुक्त वाघमारे यांनी सांगितले.
निवडणूक कार्यक्रम नामनिर्देशन अर्ज स्वीकारणे _ 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर 025 पर्यंत . अर्जाची छाननी _ 31 डिसेंबर उमेदवारी माघारीची मुदत _ 2 जानेवारी 026 , चिन्ह वाटप आणि अंतिम उमेदवार यादी _ 3 जानेवारी , मतदान तारीख _ 15 जानेवारी 026 तर निकाल _ 16 जानेवारी 026 रोजी जाहीर होणार आहे.
कोणत्या महानगरपालिकेची निवडणूक होणार आणि किती नगरसेवक असणार _ 1) बृहन्मुंबई _ २२७ , २) भिवंडी _ निजामपूर _ ९० , ३) नागपूर _ १५१ , 4) पुणे _ १६२ , ५) ठाणे _ १३१ , ६) अहमदनगर _ ६८ , ७) नाशिक _ १२२ , ८) मालेगाव _ ८४ , ९) धुळे _ ७४ , १०) जळगाव _ ७५ , ११) पिंपरी चिंचवड _ १२८ , १२ ) औरंगाबाद _ ११३ , १३ ) वसई _ विरार _ ११५ , १४) कल्याण _ डोंबिवली _ १२२ , १५) नवी मुंबई _ १११ , १६) अकोला _ ८० , १७) अमरावती _ ८७ , १८) लातूर _ ७० , १९) नांदेड _ वाघाळा _ ८१ , २० ) मीरा _ भाईंदर _ ९६ , २१) उल्हासनगर _ ७८ , २२) चंद्रपूर _ ६६ , २३) कोल्हापूर _ ९२ , २४ ) सांगली _ मिरज _ कुपवाड _ ७८ , २५ ) सोलापूर _ ११३ , २६ ) इचलकरंजी ‘ ७६ , २७ ) जालना _ ६५ , २८) पनवेल _ ७८ , २९ ) परभणी _ ६५ उमेदवारांना खर्चाची मर्यादा _ अ वर्ग महानगर पालिका _ १५ लाख रु. ब वर्ग महानगर पालिका _ १३ लाख रु. क वर्ग महानगर पालिका _ ११ लाख रु. ड वर्ग महानगर पालिका _ ९ लाख रु.





