Home Breaking आता कॅन्सरग्रस्त रुग्णांना इतरत्र जाण्याची गरज नाही ! मालेगाव_दाभाडीरोड लगत असलेल्या ”...

आता कॅन्सरग्रस्त रुग्णांना इतरत्र जाण्याची गरज नाही ! मालेगाव_दाभाडीरोड लगत असलेल्या ” सूर्योदय कॅन्सर सेंटर ” मध्ये मिळणार जन आरोग्य योजनांचा लाभ , उपचार मोफत : कॅन्सर तज्ञ डॉ. भूषण निकम

0
70
Oplus_131072

भारतराज पवार : राज्य मुख्यसंपादक , तथा महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष _  लोकहित माहितीअधिकार पत्रकार पोलिस संरक्षण संघटना . संपर्क : 9158417131                                                       मालेगाव : क.टा. महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन न्यूज चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क ; माालेगाव _ दाभाडी रोड लगत. असलेल्या सूर्योदय कॅन्सर सेंटर मध्ये कॅन्सर वरील उपचार एकत्रित महात्मा फुले जन आरोग्य योजना , आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत पूर्णपणे मोफत उपचार मिळणार असल्याची माहिती सेंटरचे प्रमुख प्रख्यात कॅन्सर तज्ञ डॉ. भूषण निकम यांनी दिली.

या रुग्णालयात शासनाच्या जन आरोग्य योजनांचा लाभ पात्र लाभार्थी रुग्णांना देण्याची सुविधा उपलब्ध असल्याने गरजू व पात्र रुग्णांना कॅन्सर उपचारा साठी लागणारा आर्थिक खर्चाचा भार कमी होण्यास मदत होणार आहे.तसेच रुग्णांना अत्याधुनिक सुविधा आणि तज्ञांकडून उपचार मिळण्यास मोठी मदत होणार असल्याचे डॉ.निकम यांनी महाराष्ट्र न्यूज ह्या न्यूज चॅनल शी बोलतांना सांगितले.

कसमादे परिसरातील उत्तर महाराष्ट्रातील कर्करोग ग्रस्त रुग्णांना अत्याधुनिक व अचूक उपचार प्रगत तंत्रज्ञान वापरून प्रसिद्ध तज्ञांकडून करण्यात येणार असून उपचार सर्वांसाठी पोहोचावे हे आमचे ध्येय असल्याचे डॉ.भूषण निकम यांनी सांगितले.या योजनेअंतर्गत विविध कॅन्सर उपचार , शस्त्रक्रिया , किमोथेरपी, रेडिएशन थेरपी तसेच इतर अत्यावश्यक सेवा उपलब्ध होणार असल्याचेही डॉ.निकम यांनी यावेळी सांगितले.त्याचप्रमाणे खूपच लवकर उत्तर महाराष्ट्रातील सर्व प्रथम पेट_ स्कैन ( PET_ SCANS ) सुविधा सुरू होणार असल्याचेही डॉ.निकम यांनी सांगितले .त्यामुळे कॅन्सरग्रस्त रुग्णांना आता इतरत्र कुठेही जाण्याची गरज नसून रुग्णांना लागणाऱ्या सर्व सुविधा आपल्या सूर्योदय कॅन्सर सेंटर मध्ये मिळणार असल्याचे डॉ.निकम यांनी सांगितले असून कॅन्सरग्रस्त रुग्णांना सूर्योदय कॅन्सर सेंटर वरदानच असून अधिक माहिती साठी रुग्णांनी सूर्योदय कॅन्सर सेंटर   मालेगाव _ दाभाडीरोड येथे संपर्क करावा किंवा 9579287314 ह्या मो. नंबर वरती संपर्क करावा असे आवाहन मुख्य प्रशासकीय अधिकारी निखिल मराठे यांनी केले आहे.

Oplus_131072

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here