भारतराज पवार : राज्य मुख्यसंपादक तथा महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष _ लोकहित माहिती अधिकार पत्रकार पोलिस संरक्षण संघटना . संपर्क : ९१५८४१७१३१ देवळा : क.टा. महाराष्ट्र न्यूज कऑनलाईन न्यूज चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : कै. शरद जोशी यांचे १० वे पुण्य स्मरणार्थ विशेष _ शेतकऱ्यांच्या नशिबी धतुराच मग सरकार कोणाचेही असो बळी राजा दुर्लक्षितच अशी आजची परिस्थिती आहे. नव्हे तर व्यथाच आहे. असे म्हणणेच योग्य ठरेल. कारण परिस्थिती निसर्गाने केली तर त्यात भरीत भर शासनाने केली की परिस्थितीची व्यथा करून टाकली.त्यामुळे आजच्या बळीराजाची वाटच लावली आणि लागतेय. अहो ओल्या दुष्काळाने शेतकऱ्यांची बिकट अवस्था झाली त्यात महाराष्ट्र सरकारने तुटपुंजी मदत जाहीर केली तर केंद्र सरकारकडे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचा अहवालच पाठविला नसल्याचे केंद्रीय मंत्रीच सांगतात त्यामुळे शेतकऱ्यांची ही वाईट व्यथा शासनाने करून शेतकऱ्यांची जणु थट्टाच चालवली तर नेते मंडळी आमदार , खासदार ,मंत्री मात्र चारो उंगली घी में डूबोकर आरामसे खा रहे ! हे तुमच्या आमच्या अर्थात मतदारांच्या जीवावरच ना ! हे मात्र पुढारी विसरलेत ही ना _ लायकी नव्हे काय ? असा प्रश्न नक्कीच शेतकऱ्यांसह सर्व मतदारराजाना पडला आहे. ही ना _ लायकी हा माज चांगला नाही. हा माज उतरविण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी , सर्व मतदार राजांनी एकजूट होऊन लढा दिला पाहिजे.यश मिळणार मात्र हेच तुम्हा आम्हा नागरिकांना कळते पण वळत का नाही ? हा सुद्धा प्रश्नच आहे. नाही एकजूटच करा .त्याशिवाय पर्यायच नाही.
भीक नको हवे घामाचे दाम
जैसे स्थिती आहे तौशापरी राहे
कौतूक ते पाहे संचीताचे !!
या संत वचनाप्रमाणे बळीराजा सतत वाटचाल करत असतो.आणि समाधानी राहण्याचा प्रयत्न करतो. अल्पसंतुष्ट असलेला हा बळी राजा चुकून वर्षातून एखादे पिक चांगले येवुन त्याला भाव बऱ्यापैकी मिळाला आणि चार पैसे घरी आले तर तो आनंदित होतो,
परंतु वरील परिस्थितीचा फारच कमी लोकांना त्याचा प्रत्यय येतो.
अणि अवकाळी,,नापिकी, पडलेले बाजारभाव,सरकारी दुरावस्था,यापैकी एखादे तरी अरिष्ट त्याला सतावतेच, आणि जैसे थे परिस्थिती निर्माण होते.
कायमच असुरक्षित,बेबरोशाचा असलेला शेती धंदा आता मोडकळीला आलेला आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
सर्वच घटकांनी दुर्लक्षिला केलेला हा बळी राजा आता हताश झाला आहे.शेती मालाला
दोन पैसे मिळु लागले की खाणारे ओरडतात, आणि भाव पडले तर रस्त्यावर माल फेखावा लागतो,आणि त्याकडे सगळे तटस्थ पाहून गंमत बघतात.
*ऐसी च्या दशकात शेतकऱ्यांचे तारणहार कै,शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी एकत्र आला*,उत्तपादन खर्चावर आधारित भाव मिळावा म्हणून प्रचंड ताकतीने आंदोलनं केली, त्यात उसाचे व कांद्याची आंदोलनं खूपच गाजली,त्या आंदोलनाची दखल संपूर्ण जगाने घेतली, विशेषतः बि,बि सी, लंडन सारख्या वुर्त वाहीन्याचे प्रतिनिधी महाराष्ट्रात तळ ठोकुन आंदोलनाचे वुर्त प्रसारित करीत असल्याचे संपूर्ण जगाने पाहिले, त्याकाळी राज्य आणि केंद्रीय सत्ताधाऱ्यांनी आंदोलनं दडपून टाकण्याचा अतोनात प्रयत्न केला,पण शेतकरी दबलाही नाही, जुमानलाही नाही, शेतकऱ्यांचे पंचप्राण कै शरद जोशी यांच्या शब्दाखातर लाखो शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करत होते,सरकार कोणतेही असो ते कायमच शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करते.
कारण शेतकरी व शेतकरी नेते एकसंघ व संघटीत नाहीत.आणी त्याचा नेमका फायदा सगळेच सत्ताधारी घेत असतात,
गेल्या चाळीस वर्षात अनेक शेतकरी आंदोलने झाली.सर्वात जास्त प्रभावी व परिणामकारक आंदोलन शेतकरी संघटनांच्या माध्यमातून स्वर्गीय शरद जोशी यांनी केले, आणि बहुतअंशी शेतकऱ्यांना काही काळ का होईना न्याय ही मिळवून दिला, , या प्रभावी आंदोलनांमुळे सरकारी दरबारी शेतकरी वर्गाची नोंद तरी झाली, त्याचा तात्कालिक फायदा शेतकऱ्यांना झाला.
*शेतकऱ्यांच्या हृदयात कायमची श्रद्धा असलेले स्व, शरद जोशी यांच्या वर शेतकऱ्यांनी भरभरून प्रेम केले.आणि ते शेतकऱ्यांचे पंचप्राण ठरले* , तो काळ शेतकरी आंदोलनासाठी सुवर्णकाळ ठरला.
दुर्दैवाने नंतरच्या काळात राजकीय हव्यासापायी शेतकरी संघटनेचे अनेक शकले झाली.
प्रत्येकाने आपले सवते सुभे उभे केले.त्यात शेतकरी हिताकडे साफ दुर्लक्ष करून स्वार्थ साधण्यासाठी नेत्यांमध्ये चढा ओढ सुरू झाली राजकीय महत्तकांक्षा वाढीस लागली.
तत्कालीन संघटनेतील पहिल्या फळीतील नेते राजकीय पक्षाच्या वळचानित जाऊन बसले.त्याचा काहिंना तात्कालिक फायदाही झाला, आणि त्यातले काही आमदार मंत्री होउन, काहींना कारखांन्याचे चेअरमन, महामंडळेही मिळाली.परंतु काही काळाने ते पदंही गेली, आणि कालांतराने त्यांच्याच पुण्याईने कारखान्यांना, सुत गिरण्याना कुलूपंही लागली,
एकेकाळी हेच नेते शेतकरी चळवळीचा भाग असताना लोकांच्या गळ्यातील ताईत बनले होते.हजारो लोक त्यांच्या हाखे खातर जमतं होते, हे नेते शेतकरी हितासाठी काही तरी करतीलच अशी भोळी भाबडी आशा घेऊन त्यांच्या मागे पळत होते.कालांतराने त्यालाही ओहोटी लागली,
परिणामी आज शेतकरी आंदोलनाची धग कमी झाली.शेतकऱ्याना आव्हाहन करूनही ते पुरेशा संख्येने जमतं नाहीत,
लोकं नैराश्यात गेले.त्यामुळे आज शेतकरी शेती मालाच्या भावासाठी आंदोलनाची हाक देऊनही शेतकरी एकत्र येत नाही.
तथाकथित शेतकरी नेते राजकीय दावणीला बांधले गेले.परिनामी त्यांची विश्वासाहर्ता कमी झाल्यामुळे लोक त्यांना प्रतिसाद देत नाहीत,
आता हेच शेतकरी नेते म्हणतात की लोक आंदोलनात उतरत नाही.पांटींबा देत नाहीत,
पण का..? असे का होते,?
या नेत्यांनी शेतकर्यांची मानसिकता बघावी व आत्मपरिक्षण करावे…
आता तर *तेलही गेले आणि तूपही गेले* *हाती धुपाटणे आले* * अशी अवस्था शेतकरी नेत्यांची झालीं आहे,
त्यातही काही लबाड कोल्हे मधल्या मार्गाने जरी प्रस्थापित झाले असले तरी दुर्दैवाने शेतकरी हितासाठी ते काहीही करत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे.परंतु त्यांनी हे लक्षात ठेवावे ते जे काही आज आहेत ते केवळ शेतकऱ्यांच्या पुण्याई मुळेच आहेत.खाले्ल्या अन्नाला जागावे ही माफक अपेक्षा !!
आता एकच हुकमी मार्ग म्हणजे राजकारण विरहित केवळ आणि केवळ शेतकरी हितासाठी संघटना उभी करून शेतकरी हितासाठीच आंदोलने उभे केले तर निश्चितच शेतकऱ्यांना न्याय मिळु शकतो,
त्यासाठी स्वर्गवासी शरद जोशी यांच्या विचारांचा वारसा नेटाने पुढे न्यायची तयारी ठेवावी लागेल,
शेतकरी प्रश्नांकडे, सरकारचे दुर्लक्ष, हेटाळणी,उपहास हे सर्व संपवायचं असेल तर सर्वांनी एकत्र येऊन केवळ शेतकरी हितासाठी , बेरोजगारांसाठी महागाई विरोधी संघटना उभी करावी, व आपले जुने वैभव प्राप्त करावे,.. हिच खरी खरी कै शरद जोशी यांना श्रद्धांजली ठरेल.
…….. कुबेर जाधव : ९४२३०७२१०२





