भारतराज पवार : राज्य मुख्यसंपादक तथा महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष _ लोकहित माहिती अधिकार पत्रकार पोलिस संरक्षण संघटना .संपर्क : ९१५८४१७१३१ मालेगाव क.टा. महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन न्यूज चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : मालेगाव तालुक्यातील तळवाडे गावचे सरपंच सौ.सारिका गमन सोनवणे यांना नाशिक येथे झालेल्या कार्यक्रमात राज्यस्तरीय नवदुर्गा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सौ.सारिका सोनवणे यांनी सरपंच पदाची धुरा हाती घेताच त्यांनी तळवाडे गावातील ग्रामस्थांच्या सुख सुविधांना प्राधान्य देऊन गावात शासनाच्या विविध योजनांचा लाभही महिला व पुरुषांना मिळून दिला.त्यांच्या कामाची दखल नाशिकच्या वंदे महाराष्ट्र संस्थेने घेऊन त्यांच्या मार्फत सौ.सोनवणे यांना हा पुरस्कार देण्यात आला. सौ.सारिका सोनवणे ह्या शिक्षित असून महाराष्ट राज्याचे शिक्षण मंत्री ना.दादा भुसे यांच्या मार्गदर्शनाखाली तळवाडे गावाचा विकास करून गावचा कायापालट करण्याचे माझे स्वप्न असल्याचे सौ.सारिका सोनवणे यांनी महाराष्ट्र न्यूज ह्या न्यूज चॅनल शी बोलतांना सांगितले. सरपंच सौ.सारिका सोनवणे यांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याचे कळताच शिक्षण मंत्री ना . दादासाहेब भुसे यांनी विशेष अभिनंदन केले. नाशिक येथील कार्यक्रमात हभप भास्कर रसाळ, संस्थेचे छगन कोळेकर , माधुरी बोलकर, रामचंद्र ताडे , रमेशगिरी गोसावी , डॉ.प्रणव गवळी , अरुण शिरोळे , दादा केदारे, इंजिनिअर शामकांत सोनवणे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आला. माझ्या कारकिर्दीत तळवाडे गावात रस्ते , पिण्याचे पाणी, गटार, नागरीसुविधा , ठक्करबाप्पा योजना ही विकासकामे गावात प्रभावीपणे केली.तसेच गावातील विद्यार्थ्यांना सुसज्ज असे वाचनालय उभारून स्वखर्चाने स्पर्धा परिक्षेची पुस्तके उपलब्ध करून दिली.तर महिलांसाठी बचत गट, रमाई , शबरी आवास, आरोग्य शिबिर आदी योजनांचा लाभ गावातील रहिवाश्यांना मिळून दिला. गावात सर्वत्र सरपंच सौ.सारिका सोनवणे यांचे अभिनंदन केले जात आहे. सौ.सारिका सोनवणे यांचे पती शामकांत गमन सोनवणे हे मालेगावी बांधकाम विभागाकडे अभियंता म्हणून कार्यरत असून ते मनमिळाऊ स्वभावाचे असल्या कारणाने त्यांनी नोकरीच्या ठिकाणी आणि तळवाडे गावी मित्रपरिवाराची मने जिंकली आहेत.





