भारतराज पवार : राज्य मुख्यसंपादक अगदी कमी वेळेत जास्तीतजास्त आपल्या मतदार संघातील , प्रभागातील , वार्डातील , गणातील , गटातील प्रत्येक घराघरात आणि घरातील प्रत्येकाच्या मनामनात पोहोचण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी आजच संपर्क करा . मो. ९१५८४१७१३१ . . सटाणा नगर पालिका ” वार्तापत्र ” सटाणा : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन न्यूज चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : सटाणा नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा रणसंग्राम अखेर सुरू झाला,तब्बल ९ वर्षाच्या प्रदिर्घ प्रतीक्षेनंतर निवडणूकिचे बिगुल वाजले आहे. नगरसेवकांचा कार्यकाळ संपून तब्बल चार वर्ष प्रशासकीय राजवट होती,सटाणा शहरातील जनतेला सोसावी लागली, तेथे ही महिला प्रकाशकांनी फारसा गाजावाजा न करता शांतपणे कारभार पाहिला, त्यांनाही खराब रस्ते, खड्ये, आणि पाणी टंचाईला तोंड द्यावे लागले,आता निवडणुकीची घोषणा झाली आहे.दरम्यान शिवसेना, राष्ट्रवादी पक्षांच्या फाटाफुटीनंतर प्रथमच होणारी ही निवडणूक अत्यंत चुरशीची होण्याची चिन्हे आहेत, सटाणा नगरपरिषदेत डिसेंबर २०१६ पासून डिसेंबर २०२१ पर्यंत शहर विकास आघाडी, आणि भाजपा युतीची सत्ता अस्तित्वात होती. थेट नगराध्यक्षपदी मत विभागानीचा पुरेपूर फायदा घेत शहर विकास आघाडीची यशस्वी मोठ बांधत सुनील मोरे हे नगर अध्यक्ष म्हणून निवडून आले होते..भारतीय जनता पक्षाचे सहा नगरसेवक निवडून आले होते.भाजपाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार बाळासाहेब सोनवणे दुसऱ्या क्रंमाकावर होते.बहुरंगी लढतीत सुनिल मोरेनी बाजी मारत नगराध्यक्ष पदाला गवसणी घातली होती,राष्ट्रवादी काँग्रेसने पाच जागांवर तर राष्ट्रीय काँग्रेसने दोन जागांवर विजय मिळविला होता तर भाजपा,शहर विकास आघाडी,काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस,शिवसेना अशी बहूरंगी लढत झाली होती. निवडणुकीनंतर शहर विकास आघाडीने भाजपचा टेकु घेत पाच वर्ष कारभार चालवला.डिसेंबर २०२१मध्ये कार्यकाळ संपल्यानंतर तात्काळ निवडणुका न होता आजतागायत पालिकेत प्रशासकीय राजवट राहिली..या चार वर्षात शहरातील विकासाची सर्वच कामं खोळंबली, निवडणुक कधी होतील,याबाबत खात्री नसल्याने राजकीय पातळीवर हालचाली मंदावल्याने शहरात शांतता होती,.विशेष बाब म्हणजे याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन पक्षां मध्ये उभी फूट पडल्याने.आजच्या परिस्थितीत भाजपाने शहरात स्वबळावर लढण्याचा नारा दिला आहे, शहर विकास आघाडीत अद्याप सामसूम परिस्थिती आहे मागिल निवडणूकी नंतर भाजपात विलीन झालेली होती सद्या तरी,भाजपा विरुद्ध महाविकास आघाडी,अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस,शिंदे सेना यांच्यत तिरंगी, चौरंगी, होण्याचे संकेत आहेत.साहजिकच निवडणुकीची घोषणा होताच शहरातील राजकीय वातावरण तापु लागलं आहे.
नगरसेवकांची संख्या २१ वरुन २४ झाली आहे.त्यातच
थेट नगराध्यक्ष पद हे इतर मागासवर्गीय महिलेकडे.गेले आहे, यामुळे साहजिकच गेल्या वेळी नगराध्यक्ष पदाच्या स्पर्धेत असणाऱ्या मातब्बराची गोची जरी झालेली असली तरी त्यांच्या सौभाग्यवतींना मैदानात उतरवले जाऊ शकते, सद्यस्थितीत भाजपाकडून तत्कालीन शहर विकास आघाडीचे थेट नगराध्यक्ष पदासाठी सटाणा शहरातील प्रतिष्ठित नागरिक तथा भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्रिधर तात्या कोठावदे यांच्या सुनबाई रुपाली कोठावधे, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नगरसेवक राहुल सुभाष सोनवणे ( पाटील )यांच्या सुविद्य पत्नी हर्षदा राहुल पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा सद्या सटाणा शहरातील काना कोपऱ्यात ऐकावयास मिळत आहे, याच बरोबर माजी नगरसेवक भाजपचे शहराध्यक्ष नितीन सोनवणे यांच्या पत्नी आशाबाई सोनवणे या च्यां ही नावाची चर्चा आहे तत्कालीन काँग्रेसचे माजी नगरसेवक गटनेते राहुल बाबा पाटील यांच्या पत्नी सौ,हर्षदा राहुल पाटील या अतिशय शांत सुशिक्षित, मनमिळावू चेहरा म्हणून परिचित आहेत,या व्यतिरिक्त राष्ट्रवादी काँग्रेस आय चे शहर कार्याध्यक्ष मनोज सोनवणे यांच्या सुविद्य पत्नी शालिनी मनोज सोनवणे, या ही थेट नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहेत, इत्यादी नांवे चर्चेत आहेत. खास महिलांमध्ये होणारी ही निवडणूक अत्यंत चुरशीची होण्याची चिन्हे आहेत. कुबेर जाधव ,, राजकीय विश्लेषक , सटाणा ९४२३०७२१०२





