भारतराज पवार : राज्य मुख्यसंपादक : 9158417131
देवळा : क.टा. महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन न्यूज चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : कुबेर जाधव :
स्वर्गीय मा, खा,हरिश्चंद्र चव्हाण यांच्या पन्नास वर्षांच्या राजकीय आणि सामाजिक कार्यात संपूर्ण जिल्ह्यात निर्विवाद वर्चस्व असलेले आणि सर्वसामान्य जनतेच्या संपर्कात असलेले सर्वमान्य लोकनेते होते.त्यांना मानणारा फार मोठा गोतावळा जिल्ह्यात आहे.पूढील महिन्यात त्यांना जाऊन एक वर्ष पूर्ण होईल.उद्या त्यांचा वर्ष श्राद्ध असल्या कारणाने त्यांच्या कार्यास उजाळा देऊन त्यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन.!
स्वर्गीय मा.खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी ग्रामपंचायत,जिल्हा परिषद,आमदारकी, आणि खासदारकी यातून संपुर्ण जिल्ह्यात विकास कामे पोहचवली आहे.साधा सरळ स्वभाव आणि त्यातूनच सामान्य जनतेशी कौटुंबिक नाळ जोडलेली होती.आणी ती शेवटपर्यंत टिकवली.कार्यकर्ता कोणत्याही पक्षाचा वा,संघटनेचा असो तो हक्काने वरिष्ठांकडे नेउन काम करून घेत असत. तसेच खासदार स्वतः निवडून आल्यानंतर मी लोकांचा, आणि सर्वांचा प्रतिनिधी आहे अशी धारणा ठेवत असत म्हणूनच त्यांना सर्व पक्षीय कार्यकर्त्यांचे पाठबळ मिळत होते आणि त्याच पाठबळावर निवडणूक लीलया जिंकत होते.
प्रत्येक सामान्य कार्यकर्त्याच्या सुख दुःखात सामील होऊन आधार देणे हे त्यांचे स्वभाव वैशिष्टे, ते शेवट पर्यंत चालूच ठेवले. शेवटचे काही वर्ष त्यांना तब्येत साथ देत नसताना सुद्धा वारंवार मुख्यमंत्री व इतर नेत्यांना भेटुन कळवण,सुरगाण्याचे विकास कामे आणि रस्ते मंजूर करून घेतले.आपली कर्म भूमीवर त्यांचे विशेष प्रेम होते.मुंबईहून परत येत असताना तब्येत ढासळली आणि पुढे त्यातून सुधारणा झालीच नाही.परंतु समाजातील वंचित घटकांडद्धल तळमळ कायम होती.
आजही कार्यकर्ते आणि सामान्य जनता त्यांच्या कुटुंबाकडे जाऊन सुख दुःख जाणून घेत आहेत. त्यांच्या कुटुंबीयांनी ही त्यांना मोलाची साथ होती,
तसेच भावि काळात मुलगा श्री, समीर चव्हाण आणि पत्नी श्रीमती कलावती चव्हाण यांच्याकडे मतदार संघातील जनता अपेक्षा व्यक्त करत आहे.
संपूर्ण जिल्ह्यात तसेच आदिवासी बहुल सुरगाणा आणि कळवण येथे चव्हाणांचा मोठा चाहता वर्ग आहे. त्यांच्या भावनांना न्याय देण्यासाठी साठी कुटुंबीयांनी पुढाकार घ्यावा व आदिवासी क्षेत्रात विकासकामे करावेत ही जन भावना आहे.
स्वर्गीय खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी एके काळी राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आणि बालेकिल्ला असलेला नाशिक जिल्हा, परंतु २००४/५ नंतर संपूर्ण जिल्ह्यात तळागाळातील लोकांपर्यंत भाजप पक्ष पोहचवला आणि पक्षाला नवीन ओळख दिली.
आता पक्षीय नेतृत्वाने चव्हाण कुटुंब आणि त्यांचे कार्यकर्ते यांना बळ देऊन जिल्ह्यातील हरिश्चंद्र चव्हाणांचे अपूर्ण कार्य पुढे चालू ठेवावे हीच खरी स्वर्गीय चव्हाण साहेबाना श्रद्धांजली. कुबेर जाधव , राजकीय विश्लेषक देवळा ,





