भारतराज पवार : राज्य मुख्यसंपादक देवळा : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : _ स्व. बाबा,
त्यांना माफ करा.. आपले थेट लाभार्थी कर्तव्यशून्य निघालेत… आम्ही आपले भव्य स्मारक उभारू
*– उदयकुमार आहेर*
स्व. बाबा,
आम्ही आपले स्मारक उभारण्याची मागणी व तयारी करत होतो. मात्र, आपले थेट लाभार्थी त्यात कमी पडले. देवळा नगरपंचायतीकडे जागेची मागणी करूनही नगरपंचायतीने मागणीकडे कानाडोळा केला. आमदार डॉ. राहुल दौलतराव आहेर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या देवळा तालुक्याच्या आमसभेत सर्वानुमते ठराव करूनही त्यांनी देखील यात जाणीवपूर्वक लक्ष घातले नाही. *तुमचे थेट लाभार्थी कर्तृत्व शून्य निघालेत.* मात्र, बाबा आपण केलेल्या कार्याची, घेतलेल्या कष्टांची व आपल्या संघर्षाची जाणीव आमच्यासारख्या कोणत्याही प्रकारच्या लाभार्थी नसलेल्या असंख्य कार्यकर्त्यांना आहे. आम्ही आपले स्मारक नक्कीच उभारू…
माजी आरोग्यमंत्री स्व. डॉ. दौलतराव आहेर बाबांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन💐🙏
उदयकुमार निंबाजी आहेर , देवळा





