Home Breaking सभ्यतेचे राजकारणाचे धिंडवडे आणि राजकारणाचे ” वलय ” गुंडगिरीकडे

सभ्यतेचे राजकारणाचे धिंडवडे आणि राजकारणाचे ” वलय ” गुंडगिरीकडे

0
44
Oplus_131072

भारतराज पवार : राज्य मुख्यसंपादक.                      स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत कमी वेळेत जास्त मतदारांपर्यंत घरघर आणि मतदारांच्या मना मनात पोहोचण्या साठी  इच्छुक उमेदवारांनी आजच संपर्क करा . मो.९१५८४१७१३१                   देवळा : क.टा.महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन न्यूज चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : निवडणूक म्हटले की , अनेक हौशे, नवशे निवडणूक रिंगणात उतरण्याची तयार असतात.पण निवडणुकी म्हटले की सभ्यतेचे नामोनिशाणच ” गुंडगिरी आणि दादागिरी ” मुळे मिटून टाकले आहे. त्यामुळे गुंडगिरीला नक्कीच याकाळात भरती आणि ओहोटी दोघेही येतात हे आपणास दिसतेच. म्हणूनच सभ्यतेचे राजकारणाचे धिंडवडे तर राजकारणाचे ” वलय ” गुंडगिरीकडे झुकल्याचे दिसते. आचार संहिता कितीही आदर्श असली पण तिची काटेकोर पण पालन करणारा , राबवणारा पोलिस आणि अधिकारी आदर्श असतो पण खमक्या असला पाहिजे.त्याचे माप न झुकणारे पाहिजे . जसे नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला झालाय आणि होतोय तो बालेकिल्ला संपूर्ण महाराष्ट्र भर राबवला गेला पाहिजे.यासाठी महाराष्ट शासन , प्रत्येक जिल्हा प्रशासनाने निर्भीड पणाने पोलिस प्रशासनास सहकार्य करणे तितकेच गरजेचे आणि मोठे मनाचे ठरेल. सध्याच्या निवडणुकीवरून असे वाटते की ,

राजकारणातून पैसा आणि पैशातून राजकारण …!!! असेच म्हटले तर वावगे नाही .

नाशिक जिल्हा हा हळूहळू का होईना कायद्याचा बालेकिल्ला होतो आहे,आता विकासाचा बालेकिल्ला होनं गरजेचे आहे …!!!

राजकारणातील गुन्हेगारीचे उदात्तीकरण एवढे झाले आहे की आता ते राजकारणातील अविभाज्य भाग बनला आहे.
त्यामुळे राजकीय नेते सुद्धा सर्वात सोपा मार्ग म्हणून अवलंबत आहेत.
सामान्य जनता ते निमूटपणे सहन करुन वाटचाल करत आहे,
सद्या नाशिक मध्ये एक आगळावेगळा ट्रेंड बघायला मिळाला, पोलिसांना बहाल केलेल्या मोकळीकचा योग्य परिणाम, आणि त्यामुळे सर्वच राजकीय गुन्हेगार सुतासारख सरळ झाले आणि नव्हे तेच ओरडून सांगू लागले,
नाशिक जिल्हा
कायद्याचा बालेकिल्ला झाला….

खरच पोलिसांना फ्री हॅण्ड दिला तर सगळे भाई आणि त्यांचे नेते शेपूट घालून पळू लागले.
वास्तविक हे सर्व महनीय आणि हेवि वेट नेते अगदी पळपुटे आणि घाबरटच असतात फक्त वातावरण निर्मिती करून आपला स्वार्थ साधत असतात.

अर्थात याच्या सुरवातील मुख्यमंत्री साहेबांचे एक वाक्य फार महत्वाचे आहे ते म्हणाले ते मेडिया समोर बोलतांना म्हणाले *मी पोलिसांना मोकळीक दिली आहे*..
याचा स्पष्ट अर्थ असा होतो की त्यापूर्वी पोलिसांवर आधी प्रचंड राजकीय दबाव होता, हे अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्र्यांनी कबूलच केले आहे,आणि हे फारच गंभीर आहे.
आता पोलिसी खाक्याने आणि खात्याने खाकीचा धाक उभा केला आहे , त्यामुळे नाशिक पोलिस अभिनंदनास पात्र आहेत, गुन्हेगारी रोखणं किती सोपे आहे हे दाखवून दिले आहे. हे झाले राजकीय गुन्हेगारी आणि गुंडगिरीच्या बाबतीत, दुसऱ्या बाजूला नाशिक शहर आणि ग्रामीण भागात प्रचंड प्रमाणात घरफोड्या आणि महिलांच्या गळ्यातील सोन्याची दागिने, सोनसाखळी चोरीच्या घटना प्रचंड प्रमाणात वाढल्या आहेत, जिल्ह्यातील सर्वच बसस्थानक हे चोरांचे अड्डे झाले आहेत, ते जणु त्यांचे माहेरघरच बनले आहेत, नाशिक जिल्ह्यातील सर्वात मोठं बस स्थानक असलेला ठक्कर बाजार बस स्थानक हे पाकिटमारांच हक्काचे व्यासपीठ बनलं आहे, तिथलं सर्वच सि सि टी व्हि यंत्रणाच बंद आहे, या बाबतीत सर्व लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या निदर्शनास आणून ही त्याचा काही परिणाम झाला नाही, या बाबतीत नाशिक जिल्हा पोलिस आणि सरकारवाडा पोलिसांनी अधिक दक्ष राहणे आवश्यक आहे, नाही म्हणायला त्यांनी मध्यवर्ती बस स्थानक व्यवस्थापक यांना प्रत्यक्ष संपर्क साधुन चोरीच्या घटना रोखण्यासाठी सि सि टी व्हि यंत्रणा २४ तास सुरू असायला हवी, तक्रार करुन १५ दिवस उलटूनही अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नाही,
आता जनतेची, आणि प्रवाशांची जबाबदारी वाढली आहे.त्यांनी येणारी निवडणूक डोळ्यात तेल घालून लक्ष दिले पाहिजे.सगळे भाई निवडणुकीत खड्यासारखे बाजूला फेकले पाहिजे.पक्ष कुठलाही असो , कितीही पैसेवाला आणि मातलेला असो, *निवडणुकीत दिसला भाई की उचलून फेका बाजुला* असे तत्व अंगिकारले पाहिजे.

सामान्यता ९० % जनता निवडणुकीपासून दूर असते आणि शेवटच्या दिवशी हवा कोणाची आहे.?.( ते झगमगाट वरून ठरवतात..) या ऐकीव माहितीवर जाऊन मतदान करतात.
पोलिसांनी त्यांचे काम योग्यच केले आता जनतेने सर्वच भाई” हद्दपार केले पाहिजे.ते पवित्र काम सर्वांनी पुढे येऊन करून, उमेदवाराचे आचरण,त्याचे मागील कार्य,त्याची पार्श्वभूमी, विकासाविषयी दिशा,उद्याचे नाशिक शहर व जिल्हा यावर काय अभ्यास आहे? यावरून उमेदवार ठरवावा.भलेही त्याच्याकडे झगमगतासाठी पैसे नसतील,खर्च करून पोसलेले कार्यकर्ते नसतील यासाठी सामान्य जनतेने पुढाकार घ्यावा. सोशल मीडियातून त्याचा प्रचार करावा.
अर्थात जनतेनी आपली ताकद दाखवून द्यावी.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारला धारेवर धरत गोर गरीब जनतेला मदत करणाऱ्या उमेदवारांना निवडून द्या,
आजपर्यंत आपण बघितले कोणीही ऐरे गैरे आले आणि राजकारणातूनच मोठे झाले.
गेल्या तीस वर्षांत नाशिक मध्ये काहीही बदल दिसत नाही.बिल्डर लाबी आणि राजकारणाची एक अभद्र युती झाली आहे.एक सुंदर शहर बकाल होत आहे.

शहरासाठी कुठलाही मास्टर प्लान नाही, बकाल रस्ते, प्रदुषित हवामान, प्रदुषित गोदावरी (गंगा)हे सर्व आपण पाहत आहोत.
गेल्या तीस वर्षांत कुठलेही नवीन उद्यान नाही.नाशिककरांना श्वास घेण्यासाठी मैदान नाही.
महापालिकेचे विकासाची रिझर्व्हेशन केलीली जागा नंतर कुठं जाते? हा एक मोठा विषय आहे.
आजपर्यंत रिझर्व्हेशन जमीनी सर्व लाभार्थी एकत्र येऊन प्रकरण कायदैशीर लढाईत अडकवले जाते किंवा ठरलेल्या मार्गावरुन गायब होते.यासाठी सर्व एकत्र आलेले दिसतात.काहींना शांत करून दूर्लक्ष करायला भाग पाडले जाते.
तर काही महाभाग स्वार्थ साधून नजर अंदाज करतात.परंतु दबक्या आवाजातील चर्चा चालू असतात.
अर्थात ही हिंमत सामान्य जनता दुर्लक्ष करतात म्हणून शक्य आहे.
*शहराला अपेक्षित आय टी पार्क, वाहतूक समस्या, नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे हे सर्व फक्त निवडणुकीतील जुमला राहिला आहे*

निवडून येऊन फक्त वयक्तिक स्वार्थ साधून पुन्हा नव्याने फसवेगिरी करणं एवढंच काम नाशिकच्या तथाकथित राजकारण्यांनी दाखवलं आहे.

आता यासाठी येणार्या इलेक्शन मध्ये नाशिक पैटर्न दाखवण्याची वेळ आली आहे.
त्यासाठी तरूणांनी पुढाकार घ्यावा आणि ज्येष्ठांनी,पेन्शनरांनी आणि इतरांनी नाशिक विकासासाठी योग्य ती साथ द्यावी.

हे सर्व शक्य आहे फक्त सामान्य जनतेने एकत्र यावे , घराणेशाही संपव्हावी , सदाचारणी लोक निवडून आणावे, आणि आपली ताकद दाखवून द्यावी.
म्हणजेच
नाशिक जिल्हा
विकासाचा बालेकिल्ला होईल.
आणि सर्व भाई सुद्धा साथ देतील.,                        कुबेर जाधव, समन्वयक 

स्वाभिमानी शेतकरी संघटना नाशिक ९४३३०७२१०२/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here