Home Breaking श्रीधरतात्या कोठावदे मित्रमंडळातर्फे” सांजपाडवा” कार्यक्रम उस्फूर्त गर्दीने संपन्न

श्रीधरतात्या कोठावदे मित्रमंडळातर्फे” सांजपाडवा” कार्यक्रम उस्फूर्त गर्दीने संपन्न

0
50
Oplus_131072

भारतराज पवार : राज्य मुख्यसंपादक.                     आपल्या परिसरातील बातम्या , जाहिराती महाराष्ट्रातील घराघरात आणि घरातील प्रत्येकाच्या मनामनात पोहोचण्यासाठी बिनधास्त संपर्क करा . मो. ९१५८४१७१३१

सटाणा : क.टा.महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन न्यूज चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क 

वरुणराजाच्या अवकाळी पावसाचे शहरावर संकटाचे सावट असतानाही, सटाणा शहरातली महिला पुरुष वर्गाने एकजुटीने “महाराष्ट्राची गौरव गाथा” या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पावसाच्या प्रतिकूल परिस्थितीतही नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला अभूतपूर्व यश मिळवून दिले.

सटाणा शहरात प्रथमच सांज पाडवा हा सांस्कृतिक सोहळा श्रीधर तात्या कोठावदे मित्र मंडळ यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. सौ. रुपाली परेश कोठावदे यांच्या पुढाकाराने आणि मार्गदर्शनाखाली हा भव्य कार्यक्रम पार पडला.

कार्यक्रमाची संकल्पना, दिग्दर्शन व निर्मिती सुप्रसिद्ध दिग्दर्शक उदय साटम यांनी केले होते. येथील पाठक मेदनवरील पटांगणात सदरचा सांस्कृतिक सोहळा संपन्न झाला.

कार्यक्रमादरम्यान महाराष्ट्राच्या वैभवशाली परंपरा, संस्कृती आणि इतिहासाचे जिवंत चित्रण आकर्षक सादरीकरणांच्या माध्यमातून सादर करण्यात आले. कलाकारांच्या अप्रतिम अभिनय व नृत्य सादरीकरणाने प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.

यावेळी सटाणा मर्चंटस बँकेच्या माजी चेअरमन रुपाली कोठावदे, माजी नगरसेवक साहेबराव सोनवणे, महेश देवरे, मंगेश खेरणार यांची भाषणे झालीत.

सांज पाडवा सोहळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी श्रीधर कोठावदे मित्र मंडळाचे श्रीधर कोठावदे, परेश कोठावदे, महेश कोठावदे, जगदीश मुंडावरे, अमोल कोठावदे, साहेबराव सोनवणे, रमेश देवरे, आदी सह मान्यवर प्रयत्नशील होते.

उत्सवाच्या दरम्यान उपस्थितांपैकी 21 भाग्यवानांना आकर्षक भेटवस्तूंचे वितरण करण्यात आले, ज्यामुळे कार्यक्रमस्थळी आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

Oplus_131072.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here