भारतराज पवार : राज्य मुख्यसंपादक , विलास माळी : उपसंपादक , महाराष्ट्रातील घराघरात आणि घरातील प्रत्येकाच्या मनामनात आपली बातमी , जाहिरात पोहचण्यासाठी बिनधास्त संपर्क करा. मो. ९१५८४१७१३१ देवळा : क.टा. महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन न्यूज चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : महाराष्ट्रात दिवाळी सणाची जोरदार धूम सुरू असून सर्वत्र गर्दीने बाजारपेठा सजल्या आहेत.तर नाशिक जिल्ह्यात येणाऱ्या आणि बाहेर गावी जाणाऱ्या नागरिकात जोरदार उत्साह दिसून येत आहे त्यामुळे रस्त्यांवर वाहतुकीची गर्दीही तितकीच खूचच दाटलेली दिसत असते.
अशावेळी दिवाळी सण साजरा करण्यासाठी बाहेर गावी जाताना आपली काळजी आपणच काळजीने घ्यावी असे आवाहन कळवण विभागीय पोलिस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी व देवळा पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक सार्थक नेहते यांनी केले आहे. देवळा तालुका कायद्याचा बालेकिल्ला असल्याचे जनतेच्या लक्षात आणून देत असताना दिवाळी निमित्त बाहेर गावी जाणाऱ्या नागरिकांना आणि विशेषतः महिलांना सावधगिरी बाळगण्यासाठी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करत असताना पोलिस निरीक्षक नेहते यांनी काही सूचना केल्या . बाहेरगावी जाताना शेजाऱ्यांना सांगून जावे , घरात मौल्यवान दागिने अथवा रोख रक्कम न ठेवता दागिने बँकेच्या लॉकरमध्ये तर रोकड बँक खात्यात जमा करावी.तसेच शक्य झाल्यास घरासमोर , कॉलनीमध्ये , मुख्यरस्ता किंवा चौकात सी. सी. टीव्ही कॅमेरे बसवावे , आपली मोटर सायकल लोखंडी साखळीने झाडाला किंवा एखाद्या खांबास लॉक करून ठेवावी म्हणजे चोरीस जाणार नाही.तर रात्रीच्या वेळी घरच्या वरांड्यात किंवा पोर्चमध्ये इलेक्ट्रिक लाईट चालू ठेवावे , बँकेतून पैसे काढताना वयस्कर व्यक्तींना एकटे पाठवू नये.त्याचप्रमाणे अनोळखी व्यक्तीजवळ पैसे मोजण्यास देऊ नये. किंवा एटीएम कार्डचा वापर करू देऊ नये , अनोळखी व्यक्ती , फेरीवाले , सेल्समन यांना घरात प्रवेश देऊ नये , एखादी व्यक्ती संशयित वाटल्यास तात्काळ पोलिसांना खबर द्यावी. आदी सूचना देवळा पोलिस निरीक्षक सार्थक नेहते यांनी केल्या असून याबाबत जनतेने विशेष दक्ष राहण्याची गरज असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यांनी यावेळी सांगून तालुक्यातील व कार्यक्षेत्रातील तमाम जनतेस पोलिस कर्मचारी यांना शुभेच्छा दिल्या.तर निरीक्षक सार्थक नेहते यांनी देवळा शहर वासियांना व तालुक्यातील समस्त जनतेस , ठाण्यातील पोलिस कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त गोड गोड शुभेच्छा दिल्या आहेत.






