Home Breaking निवडणुकीचे डोहाळे लागणाऱ्यांना लवकरच रिंगणात

निवडणुकीचे डोहाळे लागणाऱ्यांना लवकरच रिंगणात

0
88
Oplus_131072

भारतराज पवार. : राज्य मुख्यसंपादक.                     मालेगाव : क.टा महाराष्ट्र न्यूज :  जिल्हा परिषद , पंचायत समिती आणि महानगर पालिका यांच्या निवडणुका जाहीर झाल्या असून सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार वेळेवरच निवडणुका घ्यावा लागणार आहेत. त्यामुळे निवडणुकांचे डोहाळे लागलेल्या इच्छुक उमेदवारांना लवकरच निवडणूक रिंगणात उतरावे लागणार असल्याने इच्छुकांची प्रतीक्षा आता संपणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ३१ जानेवारी २०२६ च्या आधी निवडणुका घेण्याचे आदेश न्यायालयाने निवडणूक आयोगाला नुकतेच दिले असल्याने गुडघ्याला बाशिंग असणाऱ्या उमेदवारांच्या हालचालींना जोरदार वेग येण्याची शक्यता येणार असल्याची चर्चा राजकीय गोटात होत आहे.

दरम्यान १३ ऑक्टोबर २०२५ रोजी आरक्षण सोडत निश्चित झाल्यानंतरच इच्छुकांची चळवळ जोरदार होणार हे स्पष्ट झाले आहे.

राज्यातील ३२ जिल्हा परिषद, ३६३पं.स. आरक्षण सोडत १३ ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. तर २४७ नगर परिषद , ४२ नगरपंचायत निवडणूक साठीचा प्रभाग निहाय प्रारूप मतदार यादीवर हरकती आणि सूचना १३ ऑक्टोबर ०२५ दाखल करण्याची मुदत असल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here