भारतराज पवार : राज्य मुख्यसंपादक आपल्या परिसरातील बातम्या , जाहिराती साठी संपर्क मो. ९१५८४१७१३१ मालेगाव : कटा महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन न्यूज चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : आज कोजागिरी पूर्णिमा
उत्सव चांदण्या रात्रीचा. _ त्यानिमित्ताने विशेष लेख आमच्या महाराष्ट्र न्यूज च्या चोखंदळ वाचकांसाठी _
आज कोजागिरी पौर्णिमा उत्सव चांदण्या रात्रीचा आणि त्या दिवशीच हिरकणीची कामगिरी इतिहासात सुवर्णाक्षरानं लिहिली गेली…..
हिरकणी नावाची गवळीण संध्याकाळी रायगडावर दूध पोहोचवण्यासाठी गेलेली.. काम करता करता उशीर झालेला त्या माऊलीला कळलंच नाही.
महाराजांचे सक्त आदेश होते की संध्याकाळी गडाचे दरवाजे बंद झालेच पाहिजेत. कुणाचीही गय नाही. तसे दरवाजे बंद करण्यात आले.
हिरकणीने भरपूर विनवणी केली पण सेवेकरांनी दरवाजा परत उघडण्यास स्पष्ट नकार दिला ..हिरकणीला गडाखाली जाता येईना. तिचं तान्हुलं बाळ गडाखाली तिच्या घरी होतं. घरी जाऊन त्या तान्हुल्याला दूध पाजायचं होतं. त्या माऊलीची प्रचंड घालमेल झालेली होती.
अखेर मागचा पुढचा कुठलाही विचार न करता हिरकणी गडाच्या मागच्या बाजूनं (अत्यंत अवघड कड जिथून शत्रू ला ही यायला मार्ग नव्हता) अतिशय अवघड वाटेनं एकटी खाली उतरली व घरी जाऊन बाळाला घेतलं, तेव्हा कुठे तिचा जीव शांत झाला.
दुस-या दिवशी शिवरायांना ही गोष्ट कळताच राजांनी हिरकरणीचा सन्मान केला. तिच्या सन्मानार्थ रायगडावरचा एक कडा हिरकणी बुरूज म्हणून ओळखला जाऊ लागला हा सन्मान होता तिच्या मातृत्वाचा आणि धैर्याचा. _ रविराज सोनार





