भारतराज पवार : राज्य मुख्यसंपादक महाराष्ट्रातील घराघरात आणि घरातील प्रत्येकाच्या मनामनात पोहोचण्यासाठी दिवाळी निमित्त कोणत्याही प्रकारच्या जाहिराती आणि बातमी साठी संपर्क मो. ९१५८४१७१३१ , अमृत पवार _ ९४२३२५५२५३
==============
बोकडबळीची प्रथा ( परंपरा) कायम
सप्तशृंगगड _ कटा महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन न्यूज चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क _ अमृत पवार / प्रतिनिधी _
आद्य शक्तिपीठ सप्तशृंगगडावर सुरू असलेल्या शारदीय नवरात्रोत्सवाचा समारोप गुरुवारी (ता. २) झाला श्रीभगवती मंदिरासमोरील सभामंडपात शतचंडी यज्ञात न्यायालयाच्या निर्देशानुसार दसरा टप्प्यावर परंपरेनुसार बोकडबळी देऊन पूर्णाहुती देण्यात आला, शेकडो वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा आजतागायत चालू आहे,
आज सकाळी दहा वाजता ढोल ताशांच्या गजरात बोकडाची वाजत गाजत शिवालय तलावा पासून ट्रस्टच्या कार्यालयात पुजा करुन पहिल्या पायरीपर्यंत मिरवणूक काढण्यात आली, यावेळी गावातील सरपंच, उपसरपंच, सदस्य, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष, युवा नेते, ट्रस्ट अधिकारी, कर्मचारी , तहसीलदार कळवण, विविध राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी, उपस्थित होते. अभोणा पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
पूर्वीपासूनच देवीच्या मंदिराच्या पायऱ्यांवरील दसरा टप्प्यावर बोकडबळीची प्रथा सुरू होती. मात्र, ११ सप्टेंबर २०१६ ला झालेल्या अपघातामुळे भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी तत्कालीन उपविभागीय अधिकारी (कळवण) यांनी १७ सप्टेंबर २०१७पासून मंदिर परिसरातील या विधीवर बंदी घातली होती. यानंतर आदिवासी विकास संस्था (धोडंबे) यांनी जुलै २०१९ मध्ये मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी होऊन ३० सप्टेंबर २०२२ ला उच्च न्यायालयाने प्रशासन, सप्तशृंगगड देवस्थान ट्रस्ट व याचिकाकर्ता संस्थेने निश्चित केलेल्या कार्यपद्धतीनुसार बोकडबळी विधीस परवानगी दिली. त्यानुसार पाच वर्षे खंडित झालेली परंपरा ५ ऑक्टोबर २०२२ पासून पुन्हा सुरू झाली आहे. या परंपरेनुसार दसरा टप्प्यावर गुरुवारी बोकडबळी विधी ट्रस्टचा एक अधिकारी, तीन मानकरी तसेच सप्तशृंग व नांदुरी गडचे सरपंच अशा सात ते आठ जणांच्या उपस्थितीत पार पडला.
*विजयादशमीची पंचामृत महापूजा*
गुरुवारी महानवमी व विजयादशमीची पंचामृत महापूजा सकाळी सातला झाली. त्याआधी देवीच्या सुवर्ण अलंकारांची सवाद्य मिरवणूक ट्रस्ट कार्यालयातून काढण्यात आली. सकाळी गडावर घटी बसलेल्या स्थानिक महिला भाविक कीर्तिध्वजाचे दर्शन घेऊन आदिमायेस नैवेद्य दाखवून घट विसर्जन करण्यात आले . दुपारी देवीस पुरणपोळी, वरण-भात, भाजी आदी पदार्थांचा नैवेद्य दाखवून नैवेद्य आरती होऊन नवरात्रोत्सवाची सांगता झाली.





