भारतराज पवार : राज्य मुख्यसंपादक. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती महाराष्ट्रातील घराघरात घरातील प्रत्येकाच्या मनामनात पोहोचण्यासाठी बिनधास्त संपर्क करा.मो.९१५८४१७१३१ मालेगाव _ कटा महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन न्यूज चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क _
मालेगाव येथील रोटरी क्लब ऑफ मालेगाव व्हिजनच्या वतीने शीत (शव)पेटी लोकार्पण सोहळा सूर्योदय कॅन्सर हॉस्पिटलचे संचालक डॉ. भूषण निकम यांच्या अध्यक्षतेखाली आणि दाभाडीचे लोकनियुक्त सरपंच श्री. प्रमोद निकम,व्हिजनचे प्रेसिडेंट डॉ ज्ञानेश्वर सोनवणे, रो. प्रसाद पेठकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
सेवा पंधरवाडा निमित्ताने ग्रामीण भागात असणारी शीत शव पेटीची गरज लक्षात घेऊन अत्याधुनिक शीत पेटी क्लबच्या वतीने प्रदान करण्यात आली.व्हिजनच्या सदस्यांनी स्वनिधी उभा करून घेतलेली पेटी दाभाडी येथील सूर्योदय हॉस्पिटल येथे ठेवण्यात आली.ग्रामीण भागात सायंकाळी किंवा रात्री व्यक्ती मृत पावली तर शीत शव पेटीची शोधाशोध सुरु होते.परंतु गरजे इतक्या शवपेटींची उपलब्धता नसते. शिवाय आर्थिक झळ सोसावी लागते. म्हणून व्हिजनच्या वतीने मोफत उपलब्धता करून देण्यात आली आहे. फक्त पेटी सुरक्षित घेऊन जाणे आणि घेऊन येण्याची व्यवस्था वैयक्तिक स्वरूपात करायची आहे. सूर्योदय हॉस्पिटलच्या वतीने व्यवस्था पाहिली जाणार आहे.
लोकार्पण सोहळ्या प्रसंगी सुप्रसिद्ध कॅन्सर तज्ञ् डॉ. भूषण निकम यांनी जन माणसाची निकड ओळखून क्लबने केलेल्या लोकोपयोगी प्रकल्पाचे कौतुक करताना रोटरी या आंतरराष्ट्रीय संस्थेचा सदस्य असल्याचा अभिमान आहे असे सांगितले. हॉस्पिटल नवे असले तरी आतापर्यंत क्रिटिकल असणाऱ्या 13 रुग्णापैकी 12 रुग्ण सेवाभावी दृष्टीने उपचार करून पूर्णपणे बरे केले. कारण सेवा परमो धर्म: ही वृत्ती धारण करून रोटरी व्हिजन आणि सूर्योदय हॉस्पिटल काम करत आहेअसे प्रतिपादन केले. श्री. प्रमोद निकम यांनी शीतपेटी ही दाभाडी परिसरासाठी अत्यंत आवश्यक बाब असल्याचे सांगून क्लब सदस्यांचे आभार मानले.व्हिजनचे प्रेसिडेंट डॉ. ज्ञानेश्वर सोनवणे यांनी 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या सेवा पंधरवाड्यात घेण्यात येणाऱ्या प्रोजेक्टची माहिती देतांना शीत शव पेटीचा वापर सर्वसामान्य लोकानी काळजीपूर्वक करावा असे सांगताना शवपेटीची गरज असणाऱ्या मयत व्यक्तीच्या नातेवाईकांनी
सूर्योदय हॉस्पिटल (9579287314,9062256225), रो. दिपक शेलार, दिपक मेडिकल (9823357234) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन केले.रो. प्रसाद पेठकर आणि रो. भाग्यश्री क्षीरसागर यांनी आपल्या भावनात्मक मनोगतातून मालेगाव शहर आणि परिसरात कॅन्सर हॉस्पिटल नसल्याने त्यांच्या कुटुंबीय आणि आप्तेष्टांना सोसाव्या लागलेल्या यातनाची आठवण सांगून सूर्योदय हॉस्पिटलच्या वतीने पुरविण्यात येणाऱ्या सेवाभावी कार्याबदल कृतज्ञता व्यक्त केली. या प्रोजेक्टचे संकल्पक रो. दिपक शेलार यांनी प्रास्ताविक मांडताना शीत शव पेटी प्रोजेक्ट बद्दलचा उद्देश कथन करून शीतपेटी ही अत्याधुनिक स्वरूपाची असल्याने पेटी हाताळण्याची पद्धती कश्या स्वरूपाची आहे या बाबत माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रो.डॉ.सुरेखा दप्तरे यांनी तर आभार प्रदर्शन रो. प्रवीण निकम यांनी केले
या प्रसंगी डॉ. नीलिमा सुर्वे/सोनवणे(Head and neck onco Surgeon ), डॉ. भूषण वानखेडे( Head and neck Onco Surgeon)
मा. निखिल मराठे(COO SCCM ), डॉ. अहेसान शेख
(RMO Incharge) व्हिजनचे सेक्रेटरी रो.वैभव सोनवणे, रो. विजय डोखे,रो.शेखर सोनवणे,रो.ऋषिकेश शिंदे, रो.प्रा.संजय कांडेकर, रो. समाधान गांगुर्डे आदी रोटरी सदस्य आणि दवाखान्यातील रुग्ण आणि दाभाडी परिसरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
रो.प्रमोद वाघ,रो.मिलिंद सोनवणे, ट्रेझरर रो.प्रवीण निकम यांनी प्रोजेक्ट चेअरमन म्हणून भूमिका पार पाडली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रो. दिपक शेलार, रो. समाधान गांगुर्डे आदींनी परिश्रम घेतले.





