भारतराज पवार : राज्य मुख्यसंपादक आपल्या परिसरातील बातम्या , जाहिराती साठी बिनधास्त संपर्क करा.मो. ९१५८४१७१३१
सप्तशृंगी गड : कटा महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन न्यूज चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क _ अमृत पवार _
उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत आद्यस्वयंभू शक्तीपीठ असलेल्या श्री सप्तशृंगी निवासिनी देवीच्या नवरात्रोत्सव यात्रे दरम्यान हजोरोंच्या संख्येने भाविकभक्तांच्या उपस्थितीत काल सायंकाळी ५ वाजता श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टच्या मुख्य कार्यालयातून पारंपरिक पद्धतीने गवळी मानकरी पूजार्यांसह किर्तीध्वजाची
बुधवारी (ता. १) महानवमी निमित्त ट्रस्टच्या मुख्यकार्यालयात सायंकाळी ५ वाजता श्री भगवतीच्या कीर्तीध्वजाची पुरोहितांच्या मंत्रोच्चारात विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश अभय लाहोटी यांच्या हस्ते सपत्नीक संपन्न झाली . या प्रसंगी किर्तीध्वजाचे मानकरी गवळी परिवार यासह ट्रस्टचे विश्वस्त मंडळ प्रतिनिधी, ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. त्यानंतर कीर्तीध्वज मिरवणुकीस सुरवात झाली, बुधवारी मध्यरात्री सप्तशृंग शिखरावर ध्वज मानकरी गवळी परिवार यांच्या हस्ते देवीचा कीर्तीध्वज फडकविण्यात आला. त्यानंतर बुधवारी सायंकाळी ७:३० वाजता श्री भगवती मंदिरात शतचंडी याग होमहवन पूजेस विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश अभय लाहोटी यांच्या हस्ते पूजेस सुरवात झाली . गुरुवारी या शतचंडी यागाच्या पूर्णाहुतीने शारदीय नवरात्रोत्सवाची समाप्ती होईल.विधिवत पूजा देवी संस्थानचे अध्यक्ष कळवण तहसीलदार , ध्वजाचे मानकरी गवळी कुटुंबीय, पोलीस पाटील शशिकांत बेनके, आदी कुटुंबियांच्या हस्ते किर्तीध्वजाची विधिवत पूजन होऊन देवस्थानच्या मुख्यकार्यालयातून मिरवणूक निघून ढोल-ताशांच्या गजरात पहिल्या पायरीपर्यंत मिरवणूक काढण्यात आली. सप्तशृंगी माता की जय, परशुराम बाला की जय, मार्कंडेय महाराज की जय असा जयघोष करीत सप्तशृंगगड परिसर दुमदुमून गेला होता. बुधवारी मध्यरात्री सप्तशृंगीच्या शिखरावर भगव्या रंगाचा किर्तीध्वज फडकला. या किर्तीध्वजाचे दर्शन गुरुवारी पहाटेपासून भाविकांना घेता येणार आहे.
समुद्र सपाटीपासून ४६०० फूट उंची असलेल्या सप्तशृंगगडावरील दरेगावचे पाटील ( सोमनाथ गवळी) व बांधव सप्तशृंगीच्या शिखरावर चढतात. चढण्यासाठी कुठलाही मार्ग नाही, झाडे झुडपे नाही, खाच खळगे असून, मग पाटील बंधू शिखरावर जातात तरी कसे असा प्रश्न भाविक- भक्तांमध्ये चर्चिला जातो. हा चमत्कारिक अनुभव अनुभवण्यासाठी हजारो भाविक भक्त सप्तशृंगगडावर उपस्थित असतात. मातेच्या शिखरावर किर्तीध्वज फडकविण्याची परंपरा गवळी कुटुंबीय शिखरावर जाऊन ध्वजारोहन करण्याची परंपरा आहे. नवरात्रोत्सवात विजयादशमीच्या आदल्या दिवशी म्हणजेच नवमीच्या मध्यरात्री निशाण लावतात.
ध्वजासाठी ११ मीटर कापड साधारणपणे त्याच मापाची काठीही लागते तसेच जातांना मार्गातील अनुषंगिक देवतांची पूजा करण्यासाठी ३० ते ३५ किलो वजनाचे पूजा साहित्य, धान्य इत्यादी वस्तू दिल्या जातात. सायंकाळी ५ च्या सुमारास संपूर्ण गावातून किर्तीध्वजाची मिरवणूक निघून हजारो भक्तांच्या साक्षीने हा सोहळा पार पडतो. सायंकाळी ७.३० वा. श्री भगवती मंदिरात पोहोचून गवळी पाटील कुटुंबीय आई भगवती समोर नतमस्तक होवून शिखरावर चढून जुना ध्वज काढून त्याजागी नवा ध्वज फडकवून त्याची विधिवत पूजा करतात. . प्रसंगी प्रति वर्षाप्रमाणे यावर्षी देखील नाशिक ग्रामीण पोलीस,अभोणा पोलीस, कळवण पोलीस, आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी तसेच अनिरुद्ध अकॅडमी मुंबई यांचे देखील सहकार्य लाभले. ह्या विधिवत कीर्ती ध्वजाच्या सोहळ्या प्रसंगी विश्वस्त संस्थेचे व्यवस्थापक, कार्यकारी अधिकार, यांसह देवी संस्थानचे कर्मचारी ग्रामपंचायत स,गड, सरपंच ,उपसरपंच , सदस्य ,विश्वस्त संस्थेचे सर्व विभाग प्रमुख, ग्रामस्थ, भाविकभक्त व शासकीय, निमशासकीय स्वयंसेवी संस्थेतील सेवक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते





