स.पो.निरीक्षक दीपक पाटील यांची बदली

0
3
Oplus_0

भारतराज पवार : राज्य मुख्यसंपादक _ ९१५८४१७१३१                                                       देवळा : कटा महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क  देवळा येथील पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक पाटील यांची देवळा पोलिस ठाण्यातून नुकतीच बदली झाल्याचे वृत्त असल्याचे सांगण्यात आले.

पाटील यांनी प्रभारी पोलिस निरीक्षक पदी सुद्धा येथे कार्यभार सांभाळला असून त्यांनी देवळा आणि देवळा तालुक्यात शांतता राखण्यासाठी सुरुवातीच्या काळात बरीच कामगिरी केली.  एक कर्तव्य दक्ष, शिस्तप्रिय अशी त्यांची देवळा तालुक्यात ओळख होती.

तर देवळा पोलिस ठाण्यात सध्या कार्यरत असलेले पोलिस निरीक्षक ( PI )  सार्थक नेहेते यांनी देवळा आणि तालुक्यात आपली पकड मजबूत केली असून त्यांचा तालुक्यात दबदबा निर्माण झाला आहे. त्यांच्या कार्यक्षेत्रात सध्यातरी अवैध धंद्यांनी पळवाट काढली आहे.तर तालुक्यात शांतता कायम असून जनतेत सलोख्याचे वातावरण असल्या कारणाने नागरिकात नेहेते यांच्या कार्याचा गवगवा असून समाधान व्यक्त केले जात आहे.                                                                            ___ भारतराज पवार : राज्य मुख्यसंपादक                           महाराष्ट्र न्यूज (वेब चॅनल )                                        ९१५८४१७१३१ 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here