Home Breaking बी बियाणे जास्त भावाने विकल्यास कठोर कारवाई करणार : अभिमन्यू काशिद

बी बियाणे जास्त भावाने विकल्यास कठोर कारवाई करणार : अभिमन्यू काशिद

0
77
Oplus_0

भारतराज पवार : राज्य मुख्यसंपादक                       नाशिक : क टा महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : सध्या पाऊस बऱ्यापैकी झाल्याने जिल्ह्यात खरीप हंगामास नुकतीच सुरुवात झाली असून शेतकरी पेरणीच्या तयारीत सज्ज झाला आहे. त्यामुळे जिल्हाभरात गावोगावी अगदी ग्रामीण भागात सुद्धा बी बीयाण्यांच्या दुकानात विविध प्रकारचे  बियाणे खरेदी करण्या साठी शेतकऱ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात होत आहे. आणि बियाणे खरेदी करण्यात येत आहे. शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येत आहे की, आपण बियाणे खरेदी करत असताना विक्रेता कडून पक्क्या बिलाची मागणी करावी . व त्या बिलाप्रमाणेच रक्कम अदा करावी. सदरची बिल पावती सांभाळून ठेवावी. जो कोणी बियाणे विक्रेता एम आर पी ( कमाल विक्री किंमत ) पेक्षा जास्त किंमतीत बियाणे विक्री करत असेल तसेच पक्के बिल देत नसेल तर त्याची तक्रार तालुका स्तरावर तालुका कृषी अधिकारी व कृषी अधिकारी पंचायत समिती आणि जिल्हा स्तरावर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय नाशिक व कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद नाशिक यांच्याशी संपर्क साधून तक्रार करावी . किंवा तक्रार निवारण कक्ष व्हॉट्सॲप क्र. 7821032408 यावर संदेश पाठवावा असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अभिमन्यू काशिद यांनी केले आहे.

नाशिक जिल्ह्यातील सर्व बियाणे विक्रेते यांना आवाहन करण्यात येते की, कोणीही बियाणे निर्धारित एम आर पी पेक्षा जास्त किंमतीत विक्री करू नये. जर तसे आढळून आल्यास त्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल असेही काशिद यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.

काही शंका असल्यास किंवा बियाण्याच्या किंमतीत काही तफावत आढळल्यास संजय शेवाळे ( जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी) 9422224451 , दीपक सोमवंशी ( मोहीम अधिकारी ) 9975434418 , डॉ.जगन सूर्यवंशी ( जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक ) 9403546338 यांच्याशी संपर्क साधावा असेही आवाहन करण्यात आले आहे.

Oplus_0

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here